Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो…! भाजपाचं काही खरं नाही….कारण वाचा अजित पवार म्हणाले असं काही…

मुख्यमंत्र्यांच्या विधानाला मी विशेष महत्व देत नाही. मात्र मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी काय बोलावं, काय बोलू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पुणे : राज्यात भाजपा आणि महाविकास आघाडीत चांगलाचं संघर्ष रंगला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी थेट मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याच भाषा केली होती. त्यानंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं. मात्र आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथे बोलताना म्हटले होते की, माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन तीन दिवसांत कळेल, असे विधान केले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही औरंगाबाद येथे घेतलेल्या बैठकीत भाजपाशी जवळीक दाखवणारं वक्तव्य़ केले होते. मात्र या पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी भाजपाला धक्क देण्याची मोठीच योजना आखली असल्याचे समोर येत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलतांना आजी-माजी आणि भावी सहकारी अशा प्रकारचं वक्तव्य केेले होते. तर त्यांच्या आधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील य़ांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, ते समजायला तयार नाही. परंतू आमचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विधानाला मी विशेष महत्व देत नाही. मात्र मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी काय बोलावं, काय बोलू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेशासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election)

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आकुर्डीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उदघाटन करण्यासाठी आले होते. यावेळी पवार यांनी खळबळजनक दावा केला. तर पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, पक्षप्रवेशासाठी अनेक नगरसेवक इच्छुक असले तरी त्यांना इलेक्टिव्ह मेरीटवरच प्रवेश दिला जाईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी चांगले काम केल्यानतंरही 2013-14 मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा असल्याने राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसावं लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

अजित पवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचं काही खरं नाही, अशा प्रतिक्रीया आता उमटायला लागल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीतच नेमकं काय होणार हे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply