- Pune News: पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (vedant project)गुजरातला गेल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या (maharashtra) विरोधात आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp)निदर्शने सुरु आहेत. खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या नेतृत्वाखाली जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात “महाराष्ट्र को क्या मिला लॉलीपॉप” अशा घोषणा देत आंदोलन केले. (Lollypop Protest Andolan)
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रबाहेर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे दिले आश्वासन दिले आहे. “पण हा केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप राज्याला दिला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील बालगंधर्व चौकात लॉलीपॉप आंदोलन केले.
“महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप,” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत.
वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता परंतु सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातमध्ये (Gujarat) जाणार आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला प्रकल्प गुजरातमध्ये हलवला आहे. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प देखील महाराष्ट्रातून बाहेर जाणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. रिफायनरी प्रकल्प करणारी कंपनी आरआरपीसीएल राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्याची तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प हा २०१८ पासून रखडलेला आहे.