Pune Vidhan Sabha : ठरलं तर मग! महाविकास आघाडी पुण्यात अशी करणार जागांची वाटणी

Pune Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळवण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. कोणत्या पक्षाला कोणती जागा? दिली जात आहे? जाणून घेऊयात.

काँग्रेस

सूत्रांच्या माहितीनुसार पुण्यात विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाला शिवाजी नगर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे मतदारसंघ मिळू शकतात. याचे कारण म्हणजे कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विद्यामान आमदार असून शिवाजीनगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 2019 च्या निवडणुकीत काही मतांवरून पराभव झाला होता. तर दुसरीकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघ हा माजी मंत्री बागवे यांचा मतदारसंघ असल्याने तो मतदारसंघ काँग्रेसतर्फे बागवे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढवल्या होता. असे असले तरी शिवसेनेला पुण्यातून एकही जागा लढवता आली नव्हती. कारण येथील सर्व 8 जागा भाजपनेच लढवल्या होत्या. याच कारणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठकारे यांच्या शिवसेनेला कमी म्हणजेच 2 जागच मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात कोथरूड आणि वडगाव शेरी या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट

मागील म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीने वडगाव शेरी आणि हडपसर या दोन जागांवर विजय मिळवला होता. पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्ही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अशा परिस्थितीत आता शरद पवार यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला हडपसर, खडकवासला आणि पर्वती मतदारसंघ मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.

Leave a Comment