Pune Sky Bus: पुणेः पुण्यातील (Pune) वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर जमीनीवर उपाय योजना करून काहीच होणार नाही. तर आता थेट उडती बसच आणावी लागणार आहे. पुणे महापालिकेने उडत्या बससाठी (Sky Bus) प्रस्ताव तयार केल्यास केंद्र सरकार त्यास मदत करेल अशी घोषणा केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.
पुण्यातील चांदणी चौकाती पुलाच्या कामासाठी त्यांनी बैठक आयोजित केली होती, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, ‘‘ट्रॅफिकची समस्या (pune traffic issue) हा सध्या प्रत्येक मोठ्या शहरातला गंभीर प्रश्न ठरला आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी भन्नाट उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली, तर पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं गडकरी म्हणाले आहेत.
चांदणी चौकातील (chandani chowk) वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडकरींनी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. पुण्यातील सातारा रस्त्यावर (satara road traffic) होणारं ट्रॅफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार (four floors road) असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे.
“आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची (electronic bus) किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.
पुणे-बंगळुर फक्त साडेतीन तासांत
दरम्यान:
यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्गाबाबत (pune-benglore green field way) माहिती दिली. “पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारं ट्रॅफिक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असे गडकरी यांनी सांगितले.