Pune Scheme: पुणे: 8888251001 हा मोबाईल क्रमांक फोन मध्ये सेव करा आणि तुम्हाला हवे तेव्हा महापालिकेचा मिळकतराचा दाखला मिळवा. होय, property tax certificate, पावती property tax bill, पाळीव प्राणी दाखला pet certificate, जन्म दाखला birth certificate, मृत्यू दाखला असे फक्त एका मेसेजवर मिळवा. या सेवेचा शुभारंभ आजपासून झाला असून पहिल्या टप्प्यात मिळकत करा संदर्भातील सेवा एका मेसेज वर उपलब्ध करून देण्यात आलेली. (PMC gives all certificate on whatsapp, mobile number is 8888251001)
पुणे महापालिकेतर्फे Pune Municipal Corporation अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरून सध्या या सेवा उपलब्ध आहेत. तसेच सेवा दिल्या जात आहेत पण वेबसाईटवर जाऊन संबंधित विभाग शोधणे दाखल्यासाठी प्रक्रिया करणे, ॲप डाऊनलोड करणे यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. हे दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी व्हाट्सअप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, “महापालिकेने व्हाट्सअप अॅप ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकत करा संदर्भातील दाखले पावती व इतर सुविधा उपलब्ध आहे. मिळकतकर विभागाकडे नागरिकाचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास किंवा प्रॉपर्टी क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होईल. तसेच यावरून लगेच संकेतस्थळावर जाऊन बिल देखील भरता येणार आहे. पुढील काळात वाॅट्सअॅप वरूनच बिल भरता येईल अशी सुविधा केली जाईल. त्याचप्रमाणे ही सुविधा सतत अद्ययावत केले जाणार असून पुढील आठ दिवसात पाणीपट्टी, त्यानंतर जन्म-मृत्यू दाखला, पाळीव प्राण्यांचा दाखला, बांधकाम विभागाचा परवाना अशी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.