Pune Rain Alert: पुणे – मुंबईसह ‘या’ भागांसाठी रेड अलर्ट, शाळा बंद ठेवण्याचे आदेश

Pune Rain Alert: आज देखील पुण्यात धो धो पाऊस कोसळत असल्याने हवामान विभागाने पुण्यात पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. याच बरोबर देशातील इतर काही भागात देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने देखील आज म्हणजेच 25 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, आज दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मेरठ, बागपत आणि इतर पश्चिम उत्तर प्रदेश भागात हलका ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

IMD ने पुढील दोन दिवस राष्ट्रीय राजधानीसाठी ‘यलो’ अलर्ट आणि हरियाणा आणि पंजाबसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीचे कमाल आणि किमान तापमान 36 आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

IMD ने गुरुवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शहरात पाणी साचले होते. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुण्यातील सगळ्या ऑफिसला सुट्टी देण्याच कंपन्यांना आवाहन केलं आहे. 

तर दुसरीकडे हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने  या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. तर हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment