Pune Public Issue News : वाढत जाणारी लोकसंख्या (Population) आणि वाहनांची (vehicle) संख्या यामुळे कात्रज-कोंढवा (Katraj-Kondhwa) परिसरातील नागरिक नेहमी वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. पण प्रशासनाकडून (PMC authority) मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रविवारी (16 october) सुट्टीचा दिवस गाठून पुणे महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन (Protest against Pune Municipal Corporation) केले. गंगाधाम (Ganga Dham) ते शत्रुंजय मंदिर (Shatrunjay Mandir) रस्त्याचे काम करावे या मागणीसाठीसाठी कोंढवा डेव्हलपमेंट फोरमच्या (Kondhwa development forum) माध्यमातून नागरिकांनी आई माता मंदिराजवळ (Aai mata mandir)आंदोलन केले.
- Pune Politics News : शेवटी पुणेकरांच्या मिळकत कराच्या प्रश्नात राज ठाकरेंनी घातले लक्ष
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Maharashtra Politics : ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेसचे शिंदे सरकारला पत्र; पहा, काय केली सरकारकडे मागणी
- Share Market News : निफ्टी १७१अंकांनी तर सेन्सेक्स ६८४ अंकांनी वाढला
दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोंढवा परिसरात (Kondhwa area) राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर अनेकदा तक्रार करून देखील महापालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे, महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पांढरे कपडे (White cloths) परिधान करून, काळ्या रिबीन बांधल्या होत्या.
या आंदोलनामध्ये ‘रोड झालाच पाहिजे वाहतूक कोंडी सुटलीच पाहिजे’, ‘झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार असो,’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘नो रोड, नो टॅक्स,’ अश्या घोषणा करत आईमाता मंदिर ते गंगाधाम चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, ‘बघताय काय, सामील व्हा’ असे म्हणून आंदोलनात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.
या हद्दीमध्ये जड वाहनांना सक्त बंदी करावी तसेच हेल्पलाईन नंबर द्यावा, जेणेकरून अपघात झाल्यास लगेच मदत मिळेल, रस्ता दुभाजक करून, रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशा अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या.
या रस्त्यावर जड वाहनांना पुर्णतः बंदी असून देखील वाहने जातात, यामुळे वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे एका संतप्त आंदोलकाने सांगितले.
आंदोलनात सामील झालेल्या आणखी एका आंदोलकाने सांगितले, आमचा कोंढवा डेव्हलपमेंट फोरम म्हणून ग्रुप आहे, जेथे आम्ही सर्व समस्यांची चर्चा करून अधिकृतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. ” गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही यावर कायदेशीर रित्या मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत; परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करण्याचा पर्याय निवडला.”
पोलिस, सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब मुऱ्हे म्हणाले, मी माझ्यापरीने वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहे. यावर आता कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल.