Pune : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (NCP leader MP Supriya Sule) यांनी “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके” या गाण्याच्या माध्यमातून भाजपवर निशाना साधला आहे. भाजपने ठाकरेंसोबतच शिंदे गटाचेही नुकसान केले असून निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची टिका त्यांनी यावेळी केली आहे.
महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नऱ्हे (Narhe) गावातील नागरिकांच्या समस्या (Public issue) जाणून घेण्यासाठी रविवारी सुप्रिया सुळे यांनी येथील गोकुळ नगर (GokulNagar) येथे ‘जनसंवाद’ (Janasanvad) कार्यक्रम घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
- News Maharashtra today: पवारांनी सांगितले ‘ते’ गुपित; पहा खासदार मुलीबाबत नेमके काय म्हटलेय
- Chamki At Taj: विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, ताजमहालची चमक झाली ‘धूसर’, 400 पर्यटकांची निराशा
- Politics : ‘त्या’ मतदारसंघांसाठी मेगा प्लान तयार.. पहा, निवडणूक विजयाचा भाजपने काय केलाय विचार ?
त्या म्हणाल्या, राज्यात मुद्दामहून शिवसेना (Shivsena) आणि ठाकरे कुटुंबास (Thakare family) त्रास देण्याचे काम करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भाजपने कट कारस्थान करून “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके” या गाण्याप्रमाणे शिंदे गटावरही वार केला आहे. आता पक्षाचे नावही नाही आणि चिन्हही नाही. खरे तर भांडण आणि निवडणूक चिन्ह (Election symbol) गोठवल्याने दोन्ही गटांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी १९९५-९६ मध्ये चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि एन. टी. रामाराव (NT Rama Rao) यांच्यात मतभेद झाल्यानंतर आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) असाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र तेव्हा निवडणूक आयोगाने चंद्राबाबू यांना पक्षीचे चिन्ह दिले होते, असेही त्या म्हणाल्या.
भाजप नेते (BJP leaders) शिवसेना पक्ष संपला आहे, अशी टिका वारंवार करत असल्याच्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, कोणताही पक्ष आणि विचार कधीही संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असे २०१९ मध्ये बोलले जात होते, तसे झाले नाही. कोणी पक्ष संपला म्हणण्याने काही होत नाही, विचार, पक्ष आणि कार्यकर्ते कधीच संपत नाही. तसे असते तर देशातील सर्वच पक्ष संपले असते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी जे भाष्य केले, त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) यांनी बोलावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra fadnavis) यांनी दिल्याच्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, फडणवीस यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, असे काही नाही. ही काय बोर्डाची परीक्षा नाही. योग्य वेळी उद्धव ठाकरे बोलतीलच. मात्र, फडणवीस जे बोलतात, ते सर्वच खरे असेल, असे नाही. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या पक्षाचे याचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे. शिंदे गटाचे लोक कमळ चिन्हावर निवडणूक लढणार का ? हे ही त्यांनी पाहावे.