Pune Politics News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार (MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) केलेल्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी टि्वट करत सुळेंवर निशाणा साधला आहे.
“ए फॉर अमेठी (Amethi), बी फॉर बारामती”, (Baramati) असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी भाजपची काळजी करू नका, बारामतीकडे लक्ष द्या, अशी भोसरी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.
- Pune Heavy Rain News : महापालिकेच्या कामाची चौकशी होणार
- Pune News : डाॅक्टरांबद्दल महापालिका आयुक्तांचे मोठे वक्तव्य
- Fashion Tricks : महिलांना दिसायचे स्टायलिश तर या टिप्स वाचाच.. हॊईल फायदा
- Entertaiment News : ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील या दिग्गज कलाकाराचे निधन
सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपवर टीकास्त्र डागले होते. पुण्यातील (Pune) उरळी देवाची (Urali Devachi) येथे एका कार्यक्रमाच्या वेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. “आधीचा पक्ष खरा भाजप होता, पण आताचा भाजप पक्ष राहिला नसून लॉंन्ड्री (Laundry) झाली आहे. भाजपमध्ये जिकडे-तिकडे बाहेरील पक्षातून आलेले नेते दिसतात. ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत,” असा सवाल सुळे यांनी भाजप नेत्यांना विचारला होता, त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी टि्वट करुन सुळेंवर निशाणा साधला आहे. “भाजपची काळजी सोडा सुप्रियाताई, २०२४ साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या,” असा टोला वाघ यांनी सुळेंना लगावला आहे.
“भारतीय जनता पक्ष आणि आमच्या विचारात वैचारिक मतभेद होते, पण नात्यात कटुता कधीच नव्हती. आताच्या भाजप पक्षाची लॉन्ड्री झाली आहे याचं कारण म्हणजे त्यांचे ओरिजिनल (Orijnal) नेत्यांपेक्षा बाहेरचे पक्षांतर्गत करून आलेले लोक जास्त दिसतात,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांकडे आता बोलण्यासारखं काही उरलं नसून त्यांची दडपशाही सुरू आहे. ज्यांनी भाजपला वाढवला अगदी ज्यांनी माईक लावण्यापासून कामे केलीत ते कार्यकर्ते कुठे आहेत?, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. यावेळी बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काही टीका केल्याशिवाय भाजपचा एकही दिवस जात नाही,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“कुठलंही व्यासपीठ बघा तिथे मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्री पक्षाच्या व्यासपीठावर आमचे राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (SHIVSENA) आणि काँग्रेसमधून (CONGRESS) गेलेल्या नेत्यांना एवढी संधी दिली आहे, त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाचे आभार मानते,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.