Pune Politics : पावसामुळे (Rain) शहर तुंबत असल्याने एकीकडे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारभाराचे वाभाडे निघत असताना दुसरीकडे सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादी-कॉंग्रेस (NCP) आणि भाजपने (BJP) एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. ‘भाजपने पुणेकरांना पुरात लोटून शहराचा बट्ट्याबोळ केला,’ असा आरोप राष्ट्रवादी-काँग्रेसने केला असून, ‘तुम्ही सत्तेत असताना पावसाळी वाहिन्यांची कामे का केली नाहीत, याचे उत्तर जनतेला द्या,’ असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.
- Pune traffic : वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांच्या चुकांवर पालिकेचे बोट
- Shopping Tips For Mother’s : खरेदी होईल खास ;जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी आउटफिट खरेदी करत असाल तर या टिप्स वापरा
- Pune Politics : या पक्षांच्या गैरकारभारामुळे पुणेकरांना शिक्षा
- Pune Heavy Rain : आयुक्तांनी फोडले पावसावर खापर
- Pune Public Issue News : नागरिकांनी केले रस्त्यासाठी आंदोलन – कोंढवा डेव्हलपमेंट फोरमने घेतला पुढाकार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chauhan), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), प्रवक्ते अंकुश काकडे (Spokeperson Ankush kakde), प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भूमिका मांडली. ‘पावसाचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढणार असून, ढगफुटीच्या घटना वारंवार घडणार असल्याचे पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांचे (Environment NGO) म्हणणे आहे. त्याचा विचार करून भविष्यातील विकासकामे (Ecofriendly development) केली पाहिजेत. नदीपात्रातील मेट्रोचे खांब (Metro pillar), नदीसुधार प्रकल्प (Mula-Mutha riverfront project) पर्यावरणाला घातक असून, त्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे,’ असे चव्हाण म्हणाल्या.
महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर (House of leader Ganesh beedkar) यांनीही पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला (Criticize on NCP) प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात पावसाळी वाहिन्यांची (Storm Water Line) कामे का झाली नाहीत, याचे उत्तर द्यावे. भाजपने गेल्या पाच वर्षांत धोकादायक ठिकाणांची यादी करून तेथे उपाययोजना केल्या. मेट्रो, नदीसुधार प्रकल्पांना विरोध चुकीचा आहे,’ असे ते म्हणाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर विविध विकासकामांसाठी रस्ते खोदण्यात आले. त्या वेळी पावसाळी वाहिन्या बुजविण्यात आल्या असून, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे (Congress state Secretary Sanjay Balgude) यांनी केली आहे.