Pune Politics : राज्याचे सरचिटणीस (General Secretary) म्हणून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohal) यांनी पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भात (Vidharbh) काम करावे. पुणे आम्ही सांभाळू, चांगल्या कामासाठी तुम्हाला प्रमोशन (Promotion) दिले, पण पुण्यातून तुमची सुटका नाही तसेच तुम्हाला पुण्यातही काम करायचे आहे, असा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी मुरलीधर मोहोळ यांना आदेशवजा सल्ला दिला आहे. त्यावर हा माझा सत्कार आहे की निरोप समारंभ अशी मोहोळ यांनी टीका केली आहे. अशा राजकीय कोपरखळ्यांनी बुधवारी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार समारंभ रंगला.
- Pune Politics ; तुंबलेल्या पाण्यावरून राजकीय चिखलफेक
- Fashion Tricks: स्टायलिश दिसायचे तर वाचाचया टिप्स.. लव्हली वुमन म्हणून मिरवा की
- Food Crisis : रशिया-युक्रेन युद्धाचा इफेक्ट..! ‘या’ देशातील लोकांसमोर आलंय ‘हे’ मोठं संकट; जाणून घ्या..
- Pune traffic : वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांच्या चुकांवर पालिकेचे बोट
महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून मुरलीधर मोहोळ यांची (Maharashtra state BJP General Secretary) नियुक्ती झाली. त्यानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री (higher and Technical Education Minister) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष (BJP Pune city president) जगदीश मुळीक (Jagdish mulik), आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), सुनील कांबळे (Sunil Kamble), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth shirode), पुण्याचे प्रभारी धीरज घाटे (Dheeraj Ghate), संघटन सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey), स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) आदी उपस्थित होते.
भाजप सातत्याने भविष्याचा, नव्या पिढीचा विचार करतो तसेच तरूणांना संधी देतो. पक्षात संघटनात्मक निवडणुका झाल्या नसल्या तरी पक्षात लोकशाही पद्धतीने काम होते. हिंदुत्वाच्या विचारावर चालणाऱ्या भाजपमधील एक सहकारी मोठा झाला. तो आनंद व्यक्त करण्याचा आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे, असे पाटील म्हणाले.
३० वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष हाच परिवार मानून काम करत आहे. वॉर्ड अध्यक्षापासून (Ward president) महापौर (Mayor) आणि आता राज्य सरचिटणीस ही संधी पक्षाने मला दिली. यासाठी मी मला भाग्यवान समजतो. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बंद पाकिटातून पक्ष देईल, त्या आदेशाप्रमाणे काम करत आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी काम करण्याची प्रेरणा, आधार दिला. देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांकडून खूप शिकायला मिळाले. संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधीही ढळू देणार नाही, असे मोहोळ म्हणाले.
मुरलीधर मोहोळ हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते आहेत. आम्ही कायमच एकत्र काम केले. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने पुणेकरांसाठी खूप काम केले. त्यात स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून मोहोळ यांचा मोलाचा वाटा होता, असे मुळीक म्हणाले.
या सोहळ्याचे पुनीत जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे निमंत्रक गणेश बीडकर यांनी प्रास्ताविक केले