Pune News: पुणे: शहराला जलसंपदा विभागाकडून (irrigation department) पुरविण्यात येणारे अपुरे पाणी वितरित (water supply) करताना महापालिकेच्या तोंडचे पाणी पळत आहे. त्यामुळेच आता महापालिकेच्यावतीने जलसंपदा विभागाकडे अधिकृतरीत्या शहरासाठी २०.३४ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेला (Pune Municipal Corporation) शहराची तहान भागविण्यासाठी जलसंपदा विभागाकडून २००२-०३ मध्ये ११.३० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या (population) वाढीच्या तुलनेत हा कोटा वाढविण्यात आलेला नाही.
शहराला जलसंपदा विभागाकडून सर्व मिळून १४.६१ टीएमसी (TMC) पाणी दिले जात आहे. याशिवाय महापालिका खडकवासला धरण (khadakwasla Dam) साखळी, भामा आसखेड (Bhama askhed Dam) धरण व पवना धरण (Pawana Dam) येथून वर्षाला साधारणत: २० टीएमसी पाणी घेत आहे. एकट्या खडकवासला धरण साखळीतून १८.२५ टीएमसी पाणी घेण्यात येत आहे. मंजूर कोट्यापेक्षा ७ टीएमसी पाणी अधिक घेत असल्याने महापालिका विरुद्ध जलसंपदा हा वाद चर्चेत राहिला आहे. त्यात वाढत्या शहराची तहान भागविण्यासाठी अधिक पाणी घेणे गरजेचे असल्याने राजकीय हस्तक्षेपात नेहमी या वादावर पडदा पडला आहे. मात्र, यावर ठोस कार्यवाही करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
महापालिकेने आता अधिकृतरीत्या खडकवासला धरण साखळीतून २०.३४ टीएमसी पाणी देण्याची मागणी केली आहे. शहराची सध्याची लोकसंख्या (Pune city population) ५५ लाखांच्या पुढे आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार (census) पुणे शहराची लोकसंख्या ३२ लाख इतकी होती. तेव्हाही महापालिकेला शहरासाठी मंजूर असलेला पाणी कोटा पुरत नव्हता. आता तर शहरात नव्याने ३४ गावांचाही समोवश झाला आहे. शहरात दरवर्षी स्थलांतरितांचेही (migrant population) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहराचा वाढता विस्तार व समाविष्ट गावे यामुळे शहराची लोकसंख्या ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे महापालिकेने २०.३४ टीएमसी पाणी मागितले आहे. यावर जलसंपदा विभाग व राज्य शासन (state government) काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
- The Politics News: सुप्रिया सुळे भाजपच्या विरोधात आक्रमक; पहा काय भूमिका घेतली
- Pune News Today: पटोलेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान; पहा कशाचा हिशोब मागितला ते