Pune news today: पुणे (Pune) : शहरात सर्वच भागात गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर जलमय केले. खडकवासला धरण (khadakwasla Dam) साखळीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने, मुठा नदीत (mutha river) ३० हजार क्युसेक्स वेगाने पाणी साेडले जात असल्याने, भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी, अद्याप पर्यंत कोणालाही स्थलांतरित करण्याची गरज भासली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने (disaster management department head Ganesh Sonune) यांनी दिली.
- Rain alert Maharashtra: मुख्यमंत्री कार्यालयाची महत्त्वाची घोषणा; त्यांना मिळणार तातडीने मदत
- Airbag In Old Car: जुन्या कारमध्ये एअरबॅग आहे सुरक्षित? वाचा प्रश्नाचे उत्तर आणि मगच निर्णय करा
- Share Price: गुंतवणूकदार मालामाल..! 2 रुपयांना मिळणाऱ्या ‘या’ शेअर्स ने गाठला 1300 चा आकडा; जाणुन घ्या डिटेल्स
महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दिवसभरात ७१ कॉल आले आहेत. यामध्ये घरात, वस्तीत, साेसायटी पाणी शिरल्याच्या, खड्डे पडल्याच्या, झाड पडल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. या ७१ काॅल्सनुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यावर कार्यवाही केली आहे. अद्याप काेणालाही स्थलांतरीत करण्याची गरज भासली नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून नदीच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी ३९ शाळांमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ward office चाेवीस तास कक्ष स्थापन केला करण्यात आला आहे. या कक्षांमध्ये दहा उप अभियंते deputy engineer, आरोग्य निरिक्षक medical inspector आदींचा समावेश आहे. तसेच एक जेसीबी JCB, एक जेटींग मशिन getting machine, एक ट्रक, पंचवीस जणांचे मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- पावसामुळे घडलेल्या घटनांची पालिका दप्तरी नोंद (क्षेत्रिय कार्यालय)
- सिंहगड रोड : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे
- कोथरूड : मुंढे वस्ती टेबल स्टू येथे ओढ्याला पूर
- कोंढवा येवलेवाडी : टायनी इंडस्ट्रीज येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले
- औंध-बाणेर : वसंत विहार अपार्टमेंट येथे झाड पडले
- येरवडा : अमृतेश्वर मंदिर येथे घरांमध्ये पाणी शिरले
- कोथरूड : लपले फासा सोसायटी चांदणी चौक येथे सोसायटीमध्ये पाणी शिरले.
खडड्यामुळे वाहतुक संथगतीने : शहराच्या मध्यवर्ती भागाला व डेक्कन भागाला जाेडणारा भिडे पुल हा पाण्याखाली गेला असल्याने, परिसरात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. नदीकाठचा रस्ता बंद झाल्याने केळकर रस्ता, जंगली महाराज रस्ता आदी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याने, या परिसरात मोठी वाहतुक कोंडी दिवसतरात दिसून आली. त्यातच आधीच खड्डेमय झालेल्या शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्डयात पाणी साठले हाेते. यामुळे सर्व भागातील वाहतुकीची गती संथ झाली हाेती.