Pune News Today (obc reservation): पुणे (Pune) : भाजपकडे (BJP) जनतेला सांगण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी देशातील सरकार आणि भाजप जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पसरविण्याचे काम करत आहे. आपल्याला जर सत्ता काबीज करायची असेल संघर्ष कारावा लागेल आणि ओबीसींच्या (OBC) मदतीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रमुख अजयसिंग यादव (Ajaysing Yadav) यांनी व्यक्त केले.
प्रदेश काँग्रेसतर्फे ओबीसी विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबीर काँग्रेस भवन (Congress Bhavan) येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) निवडक ३०० कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), भानुदास माळी, स्वागताध्यक्ष आमदार दीप्ती चौधरी (Dipti Chavadhari), डॉ. विवेक गुरव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष साहिल केदारी, ओबीसी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे, प्रदेश सरचिटणीस सुनील पंडित हे शिबिराचे निमंत्रक होते.
चौधरी म्हणाल्या, ‘‘स्वराज्याचा आणि स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या पुण्यात झाला त्या पुण्यात हे शिबिर होत आहे, हे महत्त्वाचे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आपण कार्यकर्ते असल्याने आपल्याला चिंतनाची गरज नाही. त्यामुळेच हे मंथन शिबिर असून ते परिवर्तनाची नांदी ठरेल.’’ या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेसच्या ओबीसीचे राष्ट्रीय समन्वयक राहुल यादव, आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopate), संजय जगताप (Sanjay Jagtap), माजी मंत्री बाळासाहेब शिवकर, विश्वजीत कदम (Viswajit Kadam), काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), मोहन जोशी (Mohan Joshi), प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagave), आबा बागूल (Aaba Bagul), कमल व्यवहारे, महिला अध्यक्ष पूजा आनंद, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, उपाध्यक्ष तुकाराम माळी, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.