Pune news today: पुणे (Pune): लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांच्या वारसदारांपैकी एक कुटुंब भाजपसोबत (BJP) आधीच जोडले गेले असताना आता दुसरे कुटुंब देखील भाजप सोबत येणार का ? अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्ये असलेले रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांची पुण्यामध्ये भेट घेऊन चर्चा केली. यावरून त्यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर रोहित टिळक यांनी या भेटीबाबत कोणताही राजकीय अर्थ काढू नये असा खुलासा केला आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यावर विविध नेत्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde) आणि भाजपाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी महिन्याभरापूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakanta Patil) यांची एका कार्यक्रमात भेट घेतली होती. त्यानंतर टिळक यांनी आज भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच भेट घेतली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहेत त्यापूर्वी भाजपच्या नगरसेविका (corporator) होत्या, महापौर (Mayor) होत्या. 2019 च्या निवडणुकीमध्ये त्या आमदार म्हणून भाजपकडून निवडून आल्या. मात्र त्याच वेळेला रोहित टिळक यांचे कुटुंबीय हे काँग्रेस सोबत जोडले गेले आहे रोहित टिळक हे राहुल गांधी यांच्या टीम( team Rahul Gandhi) मधील सदस्य असल्याची चर्चा होती तसेच काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ (senior Congress leader) नेत्यांचे रोहित टिळक व त्यांचे वडील दीपक टिळक यांच्याकडे येणे जाणे असते त्यामुळे टिळक कुटुंबात भाजप आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांसोबत चांगले संबंध आहेत.
पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी भाजपचा बालकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातून दोन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्या दोन्ही निवडणुकीत रोहित टिळक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या मुक्ता टिळक या मागील काही महिन्यापासून आजारी आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज पशू संवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर विखे पाटील यांची पत्रकार परिषद होताच, रोहित टिळक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी काही वेळ चर्चा देखील केली. या भेटीमुळे रोहित टिळक भाजपात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. या भेटीबाबत रोहित टिळक म्हणाले की, अनेक वर्षापासुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी परिचय आहे, अनेकदा संवाद होत असतो. त्यामुळे आजच्या भेटीमुळे कोणत्याही प्रकाराचा राजकीय अर्थ काढू नये, मी त्यांना वैयक्तिक कामासंदर्भात भेटलो असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.