Pune News: पुणे महापालिकेच्या मिळकत विभागाने थकबाकीदारांना पैसे भरायला लावण्यासाठी अनेकदा नोटिसा पाठवल्या पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जागामालकांना आता त्यांच्या मिळकती थेट सील करून पैसे वसुलीकडे प्रयत्न सुरू केलेले आहेत. यामध्ये पर्वती भागात तब्बल सहा कोटी 98 लाखाचा मिळकत कर थकविणाऱ्या एका पश्चिम मिळकत सिल करण्यात आलेली आहे.
पर्वती येथे पन्नालाल लुंक्कड ट्रस्ट यांच्या मिळकतीवर थकबाकी रक्कम रुपये 6 कोटी 98 लाख 5 हजार 69 रुपये थकबाकी वसूल करणे करिता सहाय्यक महापालिका आयुक्त कडलख वैभव यांच्या नेतृत्वाखाली पथक गेले. त्यावेळी त्यांनी मिळकतकर भरून सीलची कारवाई टाळावी अशी विनंती केली. पण मिळकतधारकाने मिळकत कर भरण्यास असमर्थता दर्शवल्या कारणाने या ट्रस्टला टाळे ठोकण्यात आले. उपयुक्त देशमुख अजित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई मध्ये कर आकारणी कर संकलन कार्यालायकडील मा. सहाय्यक महापालिका आयुक्त वैभव कडलख, प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे,विभागीय निरिक्षक आनंद केमसे,सुहास महाजन पेठ निरीक्षक प्रदिप आचार्य, सुधीर सणस,गोरक्ष पांगरे, विनोद खवले आदी सहभागी झाले होते.