Pune News: पुणे: कात्रज (Katraj) येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात (Rajiv Gandhi Zoo) लवकरच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी ‘रेप्टाइल पार्क’ ची (reptile Park) उभारणी केली जाणार असून, प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान आता या पार्कच्या रूपाने पर्यटकांना (tourist) खुले होणार आहे. सध्याच्या सर्पोद्यानात जमिनीत कुंड करून विविध प्रजातीच्या सापांसह (snake), अजगर, मगर (crocodile) व अन्य सरपटणारे प्राणी आहेत. ते नव्याने उभारण्यात येणाऱ्या ‘रेप्टाइल पार्क’ मध्ये ग्लास बॅरिअरमध्ये ठेवण्यात येणार असल्याने, पर्यटकांना अधिक सुलभरित्या पाहता येणार आहेत.
कोरोना (Corona) आपत्तीत हे प्राणी संग्रहालय दोन वर्षे हे पर्यटकांसाठी बंद होते. परंतु आपत्तीनंतर संग्रहालय खुले झाल्यावर मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्राणी संग्रहालयात करण्यात आलेले बदल आणि पर्यटकांसाठी करण्यात येणाऱ्या नवीन सुविधांची माहिती महापालिकेच्यावतीने पत्रकारांना देण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे (Vilas Kanade), उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade), प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव (Zu director Dr. Rajkumar Jadhav) उपस्थित होते.
पर्यटकांना अधिकाधिक नवीन वन्य प्राणी पाहण्याची संधी मिळावी, यासाठी देशातील विविध प्राणिसंग्रहालयातून इतर प्राणी प्राणी विनिमय धोरणांतर्गत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या प्राणी संग्रहालयात सर्प उद्यान आहे, मात्र ते अद्ययावत करून नवीन सरपटणारे (‘रेप्टाइल पार्क’) उद्यान तयार करण्यात येणार आहे. हे सरपटणारे उद्यान १५ हजार चौरस मीटरच्या विस्तीर्ण जागेत बांधण्यात येत असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या दोन वर्षात ते पर्यटकांसाठी खुले होणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे ‘रेप्टाइल पार्क’ उभारण्यात येत आहे.
Pune News: तर पुणेकरांना पडणार पाण्याची भ्रांत; पहा कशाकडे झालेय दुर्लक्ष
पर्यटकांच्या संख्येत वाढ : कोरोना आपत्तीनंतर संग्रहालयात सोमवार ते शनिवारपर्यंत ५ ते ९ हजार पर्यटक येतात. तर रविवारी हीच संख्या २० हजाराच्या घरात पोहचत आहे. कोरोना आपत्तीपूर्वी संग्रहालयास साडेपाच कोटींचे उत्पन्न मिळत होते. आता हे उत्पन्न दुप्पटीने वाढले असून, येथील प्राण्यांच्या खााण्यावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. तर प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या देखरेख सुरक्षेतसाठी संग्रहालयात महापालिकेचे १०० कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत.
लवकरच झेब्रा दाखल होणार : महापालिकेच्या या प्राणी संग्रहालयात लवकरच झेब्रा दाखल होणार असून, त्यासाठी स्वतंत्र खंदक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या संग्रहालयाच्या १३० एकर जागेवर ३० एकर मध्ये तलाव असून, उर्वरित जागेत विविध प्राण्यांसाठी स्वतंत्र व मोठी खंदके आहेत. या प्राण्यांमध्ये आशियाई नर मादी सिंह lion, पांढरा वाघ white tiger, पाच वाघ, बिबट्या leopard, अस्वल Beer, हरिण , काळवीट, माकड Monkey, हत्ती elephant इत्यादींचा समावेश होतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, कोब्रा, विविध प्रकारचे साप, देशी मगरी आणि तारा कासव यांचा समावेश आहे.