पुणे: भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्या जॅकवेलच्या कामात तब्बल ३० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, पाणीपुरवठा विभागप्रमुखांना घेराव घालण्यात आला.
‘प्रशासकीय राजवट हटवा, पिंपरी-चिंचवड वाचवा’ अशा विविध घोषणांनी पालिका भवन दणाणून सोडले होते. यासंदर्भात अजित गव्हाणे म्हणाले, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा १२१ कोटी रुपयांची असताना, १५१ कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप नेत्यांनी पालिका प्रशासनाशी संगनमत केले असून पालिकेची आर्थिक लूट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही निविदा त्वरीत रद्द करावी, अशी मागणी केल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
must read