पुणे: बेघरांना रास्त किमतीमध्ये घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी २ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही इमारती उभारून परवडणाऱ्या दरात सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यासाठीही पात्र लाभार्थींना अनुदान देण्यात येत होते. तसेच पहिल्यादांच घर घेणाऱ्यांनाही या योजनेअंतर्गत सवलत देण्यात येत होती. मात्र नव्या योजनांना अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला आहे. योजनेचे अनुदान बंद करण्यात आले असले तरी मान्य प्रकल्पांना आणि लाभार्थींना अनुदान मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
महापालिकेने वडगांव, हडपसर, खराडी येथे २ हजार ९०० सदनिका बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महापालिकेने स्वत:ची जागा उपलब्ध करून दिली आहे. शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित रक्कम लाभार्थींना भरावयाची आहे. या गृहप्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या योजनांमधील लाभार्थींनाच केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. नव्या प्रकल्पांसाठी अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पात्र लाभार्थींना अनुदान मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.
must read
- Pune Municipal Corporation : ३४ गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादीने मागितला १० हजार कोटीचा निधी
- Health Tips: आपल्या हृदयाचे ठोके अचानक का वाढतात? पहा कारणे, लक्षण, उपाय सविस्तर