पुणे, ता. २ ः चांदणी चौकातील (Pune Chadani Chowk) उड्डाणपुलामुळे रस्ता रुंदीकरणाचा फटका महामार्गालगतच्या लगतच्या सोसायट्यांना बसला आहे. दिवसरात्र धावणाऱ्या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण (Noise pollution) ,वायू प्रदूषणाचा (Air pollution) त्रास होत आहे. त्यावर उपाय योजना कराव्यात. येथील रहिवास्यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन घेऊन बावधन सिटीझन फोरमचे काही सदस्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भेटायला आले. पण पोलिसांनी त्यांना अडविल्याने गडकरींपर्यंत ते पोहूच न शकल्याने कैफियत मांडू शकले नाहीत. त्याबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुलाच्या कामामुळे सॅफरॉन अव्हेन्यू, रामनदी कॉपरेटीव्ह सोसायटी, कुणाल बेलेझा, प्रिस्टीम फोंटाना, फ्लेमिंगो, झिनिया या सोसायट्यांमधील रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी या भागातील काही रहिवासी गडकरी यांना भेटून निवेदन देण्यासाठी आले होते. पण त्यांना गडकरी यांना भेटून निवेदन देता आले नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohal) यांच्यासमोर विषय मांडल्यानंतर मला निवेदन द्या मी पोहचविण्याची व्यवस्था करतो असे नागरिकांना सांगितले.
मुंबईमुंबई (Mumbai) ते सातारा (Satara) या महामार्गाचे रुंदीकरण करताना मुख्यरस्त्यासह सर्व्हिस रस्ता केला जात आहे. आमच्या सोसायटीच्या सीमा भिंतीला लागून सर्व्हिस रस्ता आला आहे. महामार्ग तर अवघ्या ४० मीटर लांब आहे. यामुळे वाहनांचा आवाज, धूर यामुळे मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे. आम्ही अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाने साउंड बॅरियर लावलेले नाहीत. यासंदर्भात नितीन गडकरी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे स्थानिक रहिवासी सागर म्हसूरकर यांनी सांगितले. यावेळी मनीष देव, युवेश नाईक, जय शहा उपस्थित होते.