Pune News: पुणे: पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा (Pune Parvati water supply) करणाऱ्या ठिकाणी अचानक वीज (power supply disconnected) गेल्याने संपूर्ण पेठांसह अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. एकीकडे घरामध्ये गौरी गणपतीचा (Pune Ganesh festival) सण साजरा होत असताना पाणी गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. याबद्दल अनेकांनी सोशल मिडियामध्ये संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निर्जळीला महावितरण कंपनीचा बोगस कारभार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
पर्वती जलकेंद्र येथून सर्व पेठा, स्वारगेट (Swargate),डेक्कन (Deccan Gymkhana), सातारा रस्ता (Satara Road), दत्तवाडी (dattawadi), सहकारनगर, बिबवेवाडी (bibbewadi), तळजाई या भागात पाणीपुरवठा होतो त्याचप्रमाणे लष्कर (Pune Cantonment Board )भागातही पर्वती जल केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. सकाळी साडेनऊच्या सुमारास पर्वती जलकेंद्रातील वीजपुरवठा अचानक विस्कळीत झाला.त्यामुळे शहरात तील पाणी बंद झाले, नंतर नागरिकांना त्यावर कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. तसेच पाणी पुन्हा कधी सुरू होईल याची देखील माहिती नागरिकांना अद्याप मिळाली नाही.काही माजी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला असल्याची माहिती दिली.
शहरात गणेशोत्सव (Pune Ganesh Festival 2022) सुरू आहे, अनेकांच्या घरी गौरी आगमन झालेले आहे. आजच्या दिवशी गौरी पूजन (Gauri Pujan in Pune) निमित्त प्रत्येकाच्या घरात लगबग सुरू असताना अचानक पाणीपुरवठा खंडित झाला त्याचा फटका नागरिकांना बसला. दुपार उलटून गेली तरीही पर्वती जलकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. काँग्रेसचे कार्यकर्ते अमित बागुल म्हणाले, ” पर्वती जलकेंद्रा मध्ये महावितरण च्या केबलचा फॉल्ट झाला असून, हा फॉल्ट सकाळी 9.15 झाला अजुन सुद्धा महावितरणच्या कर्मचार्यांनी लाइट चालू करता आली नाही. पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी बोललो आहे. पर्वती जलकेंद्र येथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाहीत, 2 कर्मचारी फॉल्ट शोधत आहेत. त्यामुळे अर्ध्या पुणे शहरचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे.