Pune News: पुणे: लोहगाव विमानतळावरील (lohgaon Air Force airport) अर्धा एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर (defence land) विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) काम करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी दिल्याने या भागातील वाहतूक कोंडी (traffic problem) सुटणार आहे. यासंदर्भात एक महत्वाची बैठक नुकतीच झाली.
लोहगाव विमानतळापासून विमाननगरला जोडणारा पर्यायी रस्त्यावर असलेली संरक्षण विभागाची केवळ अर्धा एकर जागेवर पुणे महापालिकेला काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा रस्ता गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमाननगरला व विमानतळावर जाण्यासाठी इतर पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता. तसेच या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यायाने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब व मानसिक त्रास होत होता. तसेच नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सदरची जागा पुणे मनपाला रस्ता बनवण्यासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे कडून केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबधित विभागाचे अधिकारी यांचे स्तरावर पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यामुळे नुकतीच संरक्षण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून १९ सप्टेंबर रोजी आदेश देऊन विमानतळावरून संरक्षण विभागाने अर्धा एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, विमाननगरला पर्यायी प्रस्तावित 20 मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी ही परवानगी महत्वाची आहे. येथे पुणे महापालिकेला काम करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नाममात्र रुपये वार्षिक परवाना शुल्कावर परवानगी देण्यात आली आहे. (1/- प्रति चौ.मी. रु.2350/- प्रतिवर्ष) यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे. या जमिनीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचा भाग पुणे महानगरपालिकेने यापूर्वीच पूर्ण केला आहे. या रस्त्यामुळे पुणे विमानतळाकडे आणि तेथून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत आणि वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
- Pune News: सात कोटीचा कर थकविल्याने ट्रस्ट सील
- Pune News: सर्पोद्यान आता होणार ‘रेप्टाइल पार्क’; पहा काय निर्णय झालाय
- Pune News: तर पुणेकरांना पडणार पाण्याची भ्रांत; पहा कशाकडे झालेय दुर्लक्ष