पुणे: पुण्याचा (Pune) पसारा वाढल्याने दोन महापालिका (Pune municipal corporation)
झाल्या पाहिजेत असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यावरून अनेकांनी पुण्याच्या तोडफोडीचा मुद्दा लक्षात घेऊन विरोधाचा सूर आळवला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पाटील यांचा मुद्दा खोडून काढून असला कोणताही प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन नाही. “कशाला विनाकारण अहवाल निर्माण करत आहात आपल्याला विकासाच्या दिशेने जायचे आहे” असे सांगत पाटील यांचे कान टोचले.

या निमित्ताने वारंवार काहीतरी वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या चंद्रकांत पाटलांना यावेळी फडणवीस यांनी मात्र फटकारल्याचेच स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट झाली 34 गावे 514 चौरस किलोमीटरचा भूभाग यामुळे पुणे शहराचा विकास (development)
करताना नियंत्रण राहत नाही हे वास्तव आहे. त्यावर कोथरूड (Kotharud) आमदार चंद्रकांत पाटील यांनी “शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे,” असे वक्तव्य गुरुवारी केले होते.

देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता आहात. जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव पुढे नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. आपल्याला विकासाकडे जायचं आहे, त्यामुळे नवनवीन वादाचे विषय काढू नका.

मी आणि अशोक चव्हाण एकाच ठिकाणी दर्शनाला :
देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते (Congress) अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांची भेट झाली असून चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर फडणवीस यांना विचाराचा फडणवीस म्हणाले, माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. गणपतीच्या दर्शनासाठी एका ठिकाणी मी पोहोचलो आणि ते देखील पोहोचले. मात्र त्यांच्या आणि माझी कुठेही भेट झालेली नाही.

Share.

Leave A Reply

Exit mobile version