Pune News: पुणे : चांदणी चौकातील पूल १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पाडणार पाडला जाणार असून १० सप्टेंबर पर्यंत सेवा वाहिनी काढून घेण्याचे ‘एनएचएआय’ने आवाहन केले आहे. चांदणी चौकातील (Pune Chandani Chowk) एनडीए पाषाण पूल (Pashan Bridge) स्फोट करून उडून दिला जाणार आहे, त्यामुळे या परिसरात असलेल्या जलवाहिनी विद्युत वाहिनी यासह मोबाईलवर इंटरनेटच्या सेवा वाहिन्या काढून घ्या असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) केले आहे.
पुणे बेंगलोर (Pune Bengalore National Highway) राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे व महामार्गाला जोडणार्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या प्रकल्पातील एनडीए पाषाण पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही सेवा वाहीन्या टाकल्या असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. हा पूल १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. त्यामुळे १० सप्टेंबर पर्यंत स्वतः च्या सेवा वाहिनी काढून घेण्यात याव्यात म्हणून पूल तोडताना जर कुणाचे नुकसान झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित व्यक्ती जबाबदार असणार आहे. त्यामुळे आपापल्या वाहीन्या काढून घ्या असे आवाहन एनएचएआयने केले आहे.