Pune News: पुणे: सदनिकांच्या किंमतीप्रमाणे मिळकतकराची (property tax) आकारणी करण्यात येणार असून आलिशान सदनिकाधारकांना तितकाच जास्त मिळकतकर भरावा लागणार आहे. महापालिका आता 80 हजार घरांना कॅपिटल टॅक्सची (capital property tax) आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिका (Pune Municipal Corporation) रेडिरेकनरच्या (ready reckoner) दरानुसार मिळकतकराची आकारणी करते. मात्र यामुळे कोणत्याही सुविधा नसलेल्या मिळकती आणि आलिशान सोसायटीमध्ये (high profile society) महागड्या किंमतींना खरेदी केलेल्या सदनिकांना समानच मिळकतकराची आकारणी होते. साध्या सोसायटीमध्ये 500 चौरस फुटांचा सदनिकेची किंमत 20 लाख असल्यास मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये सर्व सोयीयुक्त 40 लाख असते. त्यामुळे आकारणीमधील असमानता टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर (pilot project 100) घरांना आकारणी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडे याचा अहवाल मिळाला आहे. जागेवर जावून कराची आकारणी केल्यास महापालिका प्रशासनाला अधिकचे उत्पन्न मिळत असल्याचे पाहणीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने कॅपिटल टॅक्सची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (municipal commissioner Vikram Kumar) म्हणाले, शहरामध्ये अनेक प्रकारचे गृहप्रकल्प आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे सोयी सुविधा, यामध्ये जलतरण तलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृह, हॉटेल, क्रीडांगण, मनोरंजन केंद्र, अशा सुविधा असणार्‍या सोसायट्या आहेत. तर काही ठिकानी कोणतेही सुविधा नसलेल्या सोसायट्या आहेत. मिळकत कराची आकारणी करत असताना रेडीरेकनर नुसार होती. त्यामुळे आता सुविधाप्रमाणे आणि सदनिकांच्या किंमतीप्रमाणे टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे. जितक्या आलिशान सुविधा तितका जास्त कर आकारण्यात येईल

जास्त प्रकारच्या सुविधा, आणि किंमतीनुसार मिळकतकराची आकारणी करण्यात येणार आहे. यामुळे करामध्ये एकसमानता येईल. महापालिकेचे उत्पन्न वाढून शकते. त्यामुळे एका प्रभागत अंदाजे 80 हजार मिळकतींना सुरुवातीला कॅपिटल टॅक्सची आकारणी करण्यात येणार आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version