Pune News: पुण्यात एक चालती बस पेटल्याची (Burning Bus) धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमाशंकर (Bhimashankar) येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतला. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणवरुन (Kalyan) ही बस आली होती. यामध्ये २९ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने (Private Travels bus) अचानक पेट घेतली. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वी नाशिकमध्ये (Nashik) देखील अशीच घटना घडली होती.
बस जळून खाक
ही बस प्रवास करीत असताना अचानकच गाडीतून प्रवाश्यांना धूर आलेला दिसला. त्यामुळे गाडीतील सर्व घाबरले आणि वेळीच गाडी प्रसंगावधान राखल्यामुळे लागलीच ती बस थांबवण्यात आली. बघताबघता संपूर्ण बसने पेट घेतला. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केल्याचे दिसले. पेट घेतल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. बसमध्ये २९ प्रवासी होते. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यानंतर संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाच्या जवळच ही घटना घडली. सकाळी ६.३० च्या सुमारास बस घोडेगाव भीमाशंकर रोडवर असताना आग लागल्याचे लक्षात आले. ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना पटकन खाली उतरवले. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. प्रवाशांनी पोलिस स्टेशनला फोन केला आणि आमचे पथक घटनास्थळी दाखल झाले,” असे घोडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.
- Must Read:
- Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडीचे “शिवधनुष्य” मुख्यमंत्र्यांना पेलणार का ?
- Agriculture News: ‘त्या’ भागात होणार दमदार; पहा पावसाचा काय आहे अंदाज
- Doctors News: म्हणून डॉक्टरांच्या रजा-सुट्ट्या रद्द; पहा नेमकी काय परिस्थिती ओढवली
आगीचे कारण काय?
चालत्या बसने अचानक पेट घेतल्याने आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बसमध्ये अचानक आग कशी लागली हा सवाल उपस्थित होतेय. मात्र अद्याप याविषयी काहीच कळू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) असे झाले असल्याची शंका व्यक्त केली जातेय. बस संपूर्ण जळाली असल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. बसमधील आसनांचा पूर्णपणे कोळसा झाल्याचे पाहायला मिळाले.
नाशकात बस दुर्घटनेत ११ ठार
यापूर्वी नाशिकमध्ये बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली होती. लक्झरी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलची (Chintamani Travels) बस पेटली. या आगीमध्ये बसमधील जवळपास ११ प्रवासी जळून खाक झाले होते. यवतमाळ (Yavatmal) येथून बस मुंबईकडे (Mumbai) जात होती त्याच वेळी हा अपघात झाला होता.