Pune News: पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (cabinet minister Nirmala sitaraman) या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदेंनी बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी “सगळ्यांनी बारामतीला यावं. निर्मला सितारामन यांचही स्वागत जे येतील त्यांचं स्वागत आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात सुसखिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाले तरी अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मंत्र्यांना मी वेळ मागतेय पण ते गणपती आरतीत व्यस्त आहेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ५० खोके चा मुद्दा चांगला लागला. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ५० खोके, काय नाय ते ओके करून सरकार आलं. उत्साह फक्त लाल दिव्याचाच होता. अडीच महिन्यात मला जास्त काम झाल्याच मला दिसत नाही.
राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. सावंत यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचंड चेष्टा उडवण्यात आली होती. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सरकारमधील मंत्र्यांचे दौरे जे दौरे दिसतात ते एक किमीच्या आतले असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या हातातून बारामती मतदारसंघ ताब्यात घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करत आहे. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते सहकारी आहेत. मला मार्गदर्शन करतात. त्यांचं स्वागत केलं पाहीजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार यांची दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांचीभेट घेतली त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Chief Minister Eknath Shinde, Ashish Shelar met Raj Thackeray two days ago) भाजपला कुठलीही दडपशाही नाही. त्यांच्यात कोणी कुणाला भेटू शकतो. असा टोला सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे व भाजपला लगावला. परवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना गणपती मंडळांना (Dy-Chief Minister Devendra Fadnavis to Ganpati Mandal while on Pune visit) भेट देऊन असताना त्यांच्याकडून काही अटीचे उल्लंघन झाले त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, नियम बनवणाऱ्यांनी नियम मोडले तर त्याला अर्थ राहत नाही. दुर्दैव आहे. जे घडलं तो सुप्रिम कोर्टाचा अपमान आहे. गृहमंत्री फडणवीस हे वागत असतील तर अतिशय दुर्दैव आहे.