Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai phule University, Pune) चौकात आचार्य आनंदऋषी चौक उड्डाणपूल (Achary Anandrushi chauk flyover) उभारण्याच्या नियोजित कामाचा कालावधी नऊ महिन्यांनी कमी करता येऊ शकतो, असा अहवाल सल्लागार कंपनीने पुणे महानगर नियोजन प्राधिकरणाकडे (Pune Mahanagar original Development Authority) सादर केला आहे. त्यासाठी पुलाच्या आराखड्यात काही बदल सुचविले असून पीएमआरडीएने तो टाटा सिमेन्स (Tata Siemens) या कंपनीला सादर केला आहे.
पुणे विद्यापीठ चौकात (Pune University) दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सहा ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय पुमटाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीएमआरडीएने सांगितले होते. हा कालावधी आणखी कमी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करून अहवाल सादर करावा, असे आदेशही या बैठकीत दिले होते.
- Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडीचे “शिवधनुष्य” मुख्यमंत्र्यांना पेलणार का ?
- Pune Education: पुणे कृषि महाविद्यालयाच्या टीमने मिळवले भरघोस यश; पहा कोणती दमदार कामगिरी केलीय त्यांनी
- Travel : फिरस्त्यांसाठी रेल्वेची अफलातून ऑफर.. फक्त इतक्या रुपयांमध्ये भेटी द्या मुंबई-गोव्यासह या ठिकाणांना
- Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय
आधुनिक तंत्रज्ञान (Advance technology) आणि उड्डाणपुलाच्या आराखड्यात (flyover design) बदल सुचवून हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करता येऊ शकते, असा अहवाल सल्लागार कंपनीने दिला, तो पीएमआरडीएने टाटा सिमेन्स कंपनीला सादर केला. यामुळे सध्या पुलासाठी सुरू केलेल्या कामावर परिणाम होणार नसल्याचे पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर (Vivek kharwalkar) यांनी सांगितले.
विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी माॅडर्न हायस्कूल (Modern High School) येथील १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी (Water Line) हलविण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पीएमआरडीएने ई-स्क्वेअरपासून (E-Square) विद्यापीठ चौकाच्या दिशेने बॅरिकेडिंग करण्यास सुरूवात केली आहे.
चांदणी चौकातील अतिरिक्त लेनला प्राधान्य देत चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम पूर्ण केले. मात्र, हा पूल पाडल्यानंतर चांदणी चौकातील अतिरिक्त दोन लेनचे काम पूर्ण करावे, तोपर्यंत पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू करू नये, तसेच यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त (PMC Commissioner Vikram Kumar) आणि पीएमआरडीए यांची एकत्रित बैठक बोलविण्याचे ठरले होते. त्यामुळे पुढील आठवड्यात उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, महापालिकेकडून काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यातही सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिरोदिया बंगल्यापासून बॅरिकेड
उड्डाणपुलासाठीचे पिलर्स उभारण्यासाठी पाईलिंगचे काम सुरू झाले आहे. मंगळवारपासून फिरोदिया बंगला ते विद्यापीठ चौकापर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आले. तोपर्यंत महापालिकेचे जलवाहिनी हलविण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.