Pune : पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) स्वतःच्या जागेत पंतप्रधान आवास योजनेतून (Pradhan mantri Aawas Yojana urban) शहरात पाच ठिकाणी घर बांधण्याचे काम हाती घेतली आहे. तब्बल २९०० फ्लॅट (Flat) यातून तयार होत असून, त्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ मध्ये नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. पुण्यात घराच्या किंमती गगनाला भिडत असताना महापालिकेने मात्र, केवळ ११ लाखात वन बिएचके (1 BHK) दिला आहे.
- PMC Diwali Advance News : महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी ऍडव्हान्स
- Pune Municipal Corporation : मलाईदार खात्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लॉबींग
- NATO Russia Nuclear Exercises : रशियाच्या ‘त्या’ धमकीनंतर NATO सतर्क; अमेरिकेनेही दिला ‘हा’ गंभीर इशारा
आज वडगांव खुर्द (Vadgaon Khurd) येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (additional commissioner Ravindra binwade) यांनी केली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintendent Engineer Yuvraj Deshmukh), मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल (Chief Engineer Srinivas Kandul), कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) आदी यावेळी उपस्थित होते.
या गृहप्रकल्पांतील सदनिकांचे क्षेत्रफळ (Area) सुमारे ३०० चौरस फुट ते ३३० चौरस फुट असून सदनिकेमध्ये हॉल (hall), किचन (kitchen), बेडरुम (bedroom) तसेच स्वतंत्र शौचालय आणि स्नानगृह (toilet and bathroom) यांची सोय करण्यात आलेली आहे. या गृहप्रकल्पामध्ये ऍल्युमिनिअम स्लायडिंग विंडो(Aluminium Sliding Windiow) , सोलर वॉटर हीटर (Solar water heater), दुचाकीचे पार्किंग (Two wheeler parking), ऑर्गेनिक वेस्ट कन्वह्हर्टर (Organic waste converter), रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rainwater harvesting), ओपन स्पेसचे विकसन (Development of Open space), अग्निशमन यंत्रणा (Fire extinguisher), सांडपाणी प्रक्रिया सयंत्र (Sewage treatment plant), व्हेट्रीफायड टाईल्स (Vetrified tiles), प्रशस्त आतील रस्ते, प्रत्येक इमारतीस पाण्याचे मीटर, पाण्याचा प्रवाह कमी करणारे साधन इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. सदरचे गृहप्रकल्पांची कामे सुमारे ८० टक्के पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. यावेळेस ज्या लाभार्थ्यांना सदनिका मिळाली आहे त्या लाभार्थ्यांचे हस्ते वृक्षारोपण (Plantation) करण्यात आले.
सदनिकेच्या विक्री किंमतीमधून केंद्र व राज्य शासन (Central and State Government) यांचे अनुक्रमे १.५० लाख व १.०० लाख असे २.५० लाख अनुदान प्राप्त झाले असून लाभार्थ्याला फक्त ८ लाख रुपये भरावे लागणार आहे. गृह प्रकल्पासाठी लागणारी जागा पुणे महानगरपालिकेने मोफत उपलब्ध करून दिली आहे. एकूण २९१८ सदनिकांचे प्रथमतः ऑनलाईन सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे (Corona pandemic) नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक तसेच उत्पन्न, स्तोत्रा अभावी कर्ज प्रकरणे मंजूर न होणे, जागा पसंत नसणे या कारणास्तव बऱ्याच सदनिका रद्द झाल्या आहेत.
या अनुषंगाने पहिल्या ऑनलाईन सोडतीनंतर (Online Lottery) व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First preference) मधून शिल्लक राहिलेल्या व रद्द होऊन शिल्लक राहणाऱ्या सदनिकांकरिता नागरिकांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. रिक्त सदनिकांची ऑनलाईन सोडत काढून वाटप करण्यात आले. रिक्त सदनिकांकरिताचे वाटप प्रतीक्षा यादीमधील नागरिकांना वितरीत करण्याकरिता कागद पत्रे पडताळणी सुरु आहे, अशी माहिती बिनवडे यांनी दिली.