Pune : शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam Problem) सोडविण्यासाठी आतापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. मात्र, पुण्यातील वाहतूक कोंडीची स्थिती जैसे थे वैसे कायम आहे. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक गंभीर (serious condition) झालेली आहे. आता पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवधनुष्य उचलले आहे. या संदर्भात पुढच्या आठवड्यात मुंबईमध्ये (Mumbai) बैठक आयोजित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होणार, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरीच चर्चा होणार की पुन्हा एकदा कागदावरचे नियोजन होणार हे पाहावे लागणार आहे.
- Pune : चांदणी चौकात गाजावाजा करत स्फोट तर केला पण काम अर्धवटच राहिले
- Himalaya Accident: अरेरे, हिमस्खलनात ‘इतके’ मृत्यू; अनेकजण बेपत्ता, पहा काय घडले…
- ‘या’ दिवशी महाराष्ट्रात धडकणार मान्सून; जाणुन घ्या संपूर्ण माहिती
- Aaditya Thackeray: “मी राजकारणाविषयी बोलणार नाही पण महाराष्ट्रातील राजकारण…”
मुख्यमंत्री शिंदे हे आळंदीला (Alandi) जाण्यापूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे (Pramod bhangiri), अजय भोसले (Ajay Bhosale), किरण साली (Kiran Sali) यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यात यावा. तसेच, महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न (Pune Municipal Corporation employee problem) सोडवावेत. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात यावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या.
या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे शहराध्यक्ष भानगिरे यांनी सांगितले.