Pune News : पुणे शहराची (Pune city) हद्द वाढत असताना डॉक्टरांचे (Doctor) महत्त्वही त्याच प्रमाणात वाढत आहे. पण महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) नियमांमुळे (Rules and Regulations) व्यवसाय करताना डॉक्टरांना अनेक अडचणी येत आहेत. या संदर्भात काँग्रेसतर्फे (Congress) डॉक्टर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी महापालिका शहरातील सर्व डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत डॉक्टरांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिले.
- Pune News : सामान्य नागरिकांना मिळणार हक्काचे घर
- Market Closing Bell : निफ्टी आणि सेन्सेक्स आज हिरव्या रंगात बंद
- Goa Business News : म्हणून गोव्यात आता बिअर महागणार
- Maharashtra Politics : ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेसचे शिंदे सरकारला पत्र; पहा, काय केली सरकारकडे मागणी
पुणे शहर (Pune city) काँग्रेस कमिटी (Congress Commity) आणि पुणे शहर (Pune city) डॉक्टर सेल (doctor sale) तर्फे मागील आठवड्यात डॉक्टरांचा मेळावा घेण्यात आला. त्यात काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्या अनुषंगाने शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind shinde) आणि डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संभाजी करांडे (Dr. Sambhaji Karande) यांच्या पुढाकारातून पुणे मनपा आयुक्त आणि डॉक्टर सेल पदाधिकारी यांच्यात मीटिंग पार पडली.
यामध्ये प्रामुख्याने नव्याने समाविष्ट २३ गावातील नवीन हॉस्पिटल रजिस्ट्रेशन (New Hospital Registration) त्यातील अडचणी, परवाना नूतनीकरण आकारण्यात येणाऱ्या अवास्तव चार्जेस, छोट्या क्लिनिक बायोमेडिकल वेस्ट (Problem of Biomedical Waste collection) संकलनात येणाऱ्या अडचणी याची संख्या १० हजाराच्या घरात असताना त्याच्या संकलनात सुसूत्रता नाही. अशा अनेक अडचणींना रोज सामोरं जावं लागत आहे, म्हणून डॉक्टर सेल माध्यमातून डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी त्यावर तातडीने बांधकाम खात्यातील (building permission department officer) अधिकारी, पास्को अधिकारी (POSCO) यांचेबरोबर मीटिंग घेऊन तात्काळ उपाययोजना योजून मार्ग काढू, अशी ग्वाही पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी आज डॉक्टर सेल शिष्टमंडळ यांना दिली.
याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Congress City president Arvind Shinde), रमेश बागवे (Ramesh bagwe) नगरसेवक अविनाश बागवे (Avinash bagwe), डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. संभाजी कारंडे, अध्यक्ष डॉ. रवींद्रकुमार काटकर (Dr. RvindraKumar Katkar), सेक्रेटरी डॉ. अनिकेत गायकवाड (Dr. Aniket Gaikwad), उपाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब गरड (Dr. Annasaheb garad), डॉ. भरत कदम (Dr. Bharat Kadam,) डॉ. ऋषिकेश नाईक आदी डॉक्टर सेल पदाधिकारी उपस्थित होते.