Pune: पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता असताना 23 गावांचा समावेश झाला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने (MVA GOVERNMENT) या गावांसाठी पाच पैसे देखील दिलेले नाहीत. सर्व जबाबदारी पुणे महापालिकेवर पडली. मात्र, आता राज्यात सत्ता परिवर्तन होताच राष्ट्रवादी काँग्रेसने २०२१ मध्ये आलेले २३ गावे व २०१७ मध्ये ११ गावे यांच्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज पुणे महापालिका आयुक्तांशी (Pune Municipal Commissioner) या गावातील समस्या संदर्भात चर्चा केली असून त्यावेळी ही मागणी करण्यात आली.
नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी (basic facilities) सुविधा मिळत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही (no facility of drinking water), खासगी टँकरने होणारा पाणीपुरवठा, कचरा संकलन करण्यासाठी अपुरी व्यवस्था (garbage problem), पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झालेले रस्ते, नागरिकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत अशी या समाविष्ट गावांची परिस्थिती आहे.
- Pune News : कधी होणार विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल सुरू ?
- Maharashtra Politics : “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके”, असे गात सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
- Health Tips: लसणाचे फायदे : रोज करा गरम पाण्यासोबत लसणाचे सेवन; शरीराला मिळतील अनेक फायदे
- Money Making Scheme: सरकारी योजनेतून मिळणार प्रतिमाह रु. 50,000; वाचा गुंतवणुकीची महत्वाची स्कीम
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी (IT) व इतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांनी या समाविष्ट गावांमधील सोसायटीमध्ये आपल्या सदनिका घेतल्या असून या सर्व नागरिकांना सोयी सुविधा देण्यास पुणे महानगरपालिकेची सध्याची यंत्रणा कमी पडत आहे. या समाविष्ट गावांमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे, नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे (drainage line), एसटीपी प्लॅन्ट उभे करणे, पाणीपुरवठा योजना सुरू करणे, नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यविषयक (health facility) देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे, ही कामे तातडीने होणे गरजेचे आहेत. या समाविष्ट गावांमधील नागरिकांना या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारकडे १० हजार कोटींची मागणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, त्यासाठी हे खड्डे दुरुस्त करण्यात यावे. पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून दर आठवड्यात किमान एक दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो ही परिस्थिती सुधारून ३६५ दिवस नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे, शहरात ठिकठिकाणी दिसणारा कचरा त्याची विल्हेवाट लावत शहर स्वच्छ करणे, शहरातील मोकाट जनावरे कुत्री यांचा बंदोबस्त करणे, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या बिना वापर पडून आहेत या टाक्यांबाबत तातडीने निर्णय घेऊन त्या वापरात आणणे व नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करणे या मागणी देखील यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCPCT President Prashant Jagtap) म्हणाले की , “पुणे शहरातील समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सदर निधी मिळणे अत्यंत गरजेचे असून याबाबत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार (NCP Leader Ajiy pawar) यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. समाविष्ट गावांमध्ये सोयी सुविधा मिळाव्या हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका असून या गावांमध्ये सोयी सुविधा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
यावेळी खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chauhan), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), चेतन तुपे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, दिपक मानकर, दिपाली धुमाळ, विशाल तांबे, अश्विनी कदम, महेंद्र पठारे, निलेश निकम, प्रदीप गायकवाड, काकासाहेब चव्हाण, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.