Pune : पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation ) रिक्त पदे भरण्यासाठी घेतलेल्या ऑनलाईन (Online ) परीक्षेचा निकाल (Results ) लागण्यास आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या निकालात कोण अपात्र व कोण पात्र हे उमेदवारांना बघता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेने परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर (PMC Website )जाहीर केला आहे. http://pmc.gov.in/recruitment/re%E2%80%A6 या लिंक वर क्लिक करून उमेदवार आपला निकाल बघू शकता, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (additional commissioner Ravindra Binawade ) यांनी दिली आहे.
Today’s Pune news: चंद्रकांत पाटील यांनी घातली साद; ‘त्या’ मुद्द्यावर म्हणाले की..
Amit Shah in Mumbai: शाह यांनी केले ‘त्याचे’ कौतुक; पहा मुंबई गणपती भेटीमधील क्षणचित्रे
IPL 2023 : आयपीएलबाबत मोठा अपडेट.. पहा, लिलावासाठी काय सुरू आहेत हालचाली
Good News : Girls birth ratio increase as compared to last 5 years; see IMP Updates
Pune News Today: म्हणून महापालिकेने १३ ठेकेदारांना केले ब्लॅकलिस्ट
महापालिकेने नुकतीच यांत्रिकी (mechanical ), वाहतूक नियोजन (traffic planning ), विभागातील कनिष्ठ अभियंता (junior engineer ) पदासाठी परीक्षा घेतली. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी २ हजार २६४ उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी १ हजार ५७५ उमेदवारांनी परीक्षा दिली. दोनशे गुणांच्या या ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक होते.
या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. हे निकाल परीक्षा घेणार्या आयबीपीएस या कंपनीनेच जाहीर केले आहेत. परीक्षार्थीना त्यांच्या लॉगइनला मिळालेले गुण पाहाता येणार आहेत. पुढील टप्प्यात सर्वाधीक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी, वेटींग लिस्ट आणि नियुक्त पत्रे दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.