पुणे :पुणेकरांनो तुम्हाला कात्रज-शिंदेवाडी रस्त्यावरून जायचे असेल तर हि बातमी एकदा वाचा आणि मगच प्रवास करा. कात्रज-शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात आली आहे. जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.

दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करून साताऱ्याकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश प्रसृत केले आहेत.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version