Pune Heavy Rain News : पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पुणे महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. वारंवार हे प्रकार घडत असल्याने महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कामाची चौकशी (Inquiry) केली जाईल, असे पालकमंत्री (Guardian Minister) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.
- Pune News : डाॅक्टरांबद्दल महापालिका आयुक्तांचे मोठे वक्तव्य
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Share Market Closing Bell News: शेअर बाजारात घसरण सुरूच ; सेन्सेक्स ३९० अंकांनी घसरला तर निफ्टीही १७००० च्या जवळ बंद
- Pune News : सामान्य नागरिकांना मिळणार हक्काचे घर
चंद्रकांत पाटील हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरात थोडा मोठा पाऊस सुरू होताच काही मिनिटात जंगली महाराज रस्ता (Jungali Maharaj Road), फर्ग्युसन रस्त्यासह (Ferguson College Road) इतर भागात पाणी तुंबले आहे. ‘पावसाळी गटारे (Storm Water Line) स्वच्छ केली आहेत, त्यातून पाणी वाहून नेण्याची पुरेशी क्षमता आहे’, असा दावा करणाऱ्या महापालिकेचा खोटारडेपणा यामुळे समोर येत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे.
या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा पावसाचे गणित कळत नाहीये, कमी वेळात खूप जास्त पाऊस पडत आहे. पाणी तुंबत असल्याने नागरिकांच्या तक्रारी समजून (Public issue) घेण्यात येतील. रस्त्यावरील पाणी वाहून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काळ काल कमी वेळेत पाऊस पडला. परंतु वारंवार पाणी का तुंबत आहे, याची चौकशी करण्यात येईल. जिल्ह्यात ही (Pune District rural area) पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.