Pune Heavy Rain : शहरात (City) काल झालेल्या मुसळधार (heavy rain) पावसामुळे दाणादाण उडालेली असताना महापालिकेच्या कामावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त (PMC commissioner) विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी शहर तुंबण्याचे खापर पावसावर फोडले आहे. शहरात ६० ते ६५ मिलिमीटर (Millimeter) पावसाचे पाणी वाहून नेण्याची पावसाळी गटारांची (storm Water Line) क्षमता (Capacity) आहे, पण अडीच तासात १०५ मिमी पाऊस पडल्याने ही स्थिती निर्माण झाली. कालचा पाऊस म्हणजे ढगफुटीच (cloudburst होती, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला आहे.
- Pune Public Issue News : नागरिकांनी केले रस्त्यासाठी आंदोलन – कोंढवा डेव्हलपमेंट फोरमने घेतला पुढाकार
- Pune Politics News : शेवटी पुणेकरांच्या मिळकत कराच्या प्रश्नात राज ठाकरेंनी घातले लक्ष
- Pune Heavy Rain News : महापालिकेच्या कामाची चौकशी होणार
- Army Area News : म्हणून लष्कराच्या परिसरात नव्याने होणाऱ्या बांधकामांना लागला ब्रेक
विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी आज पत्रकारांशी संवाद (Press Conference) साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात ६५ मिमी पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी मानली जाते. पण इथे त्यापेक्षाही दुप्पट पाऊस पडला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले (water overflowed), रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. १८ वस्त्यांमध्ये पाणी घुसले, दोन ठिकाणी भिंत पडली पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेने पावसाळी गटारांची केलेली व्यवस्था ही ६० ते ६५ मिमीच्या क्षमतेनुसार केलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावरची माती, प्लास्टिक (Plastic) व इतर कचरा पाण्यासोबत वाहून गेल्याने पावसाळी गटारी तुंबल्या होत्या. हा कचरा काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी आमची टीम रात्रभर काम करत होती.
सिमेंट रस्ता (Cement road) करताना पावसाळी गटार (sewer) टाकल्या जातातच, पण पाऊस जास्त पडत असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शुक्रवारी ७८ मिमी (78 MM) पाऊस पडला, त्यानंतर काल १०५ मिमी (105mm) पाऊस पडला, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. काल हवामान खात्याने (Wheather account) ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला होता, त्यामळे ६५ मिमीपर्यंत (65mm) पाऊस पडणे आवश्यक होते. पण १०५ मिमी (105mm) पाऊस झाल्याने पाणी तुंबले. तसेच मेट्रोने (Metro) काम करताना बेरिकेडिंग (barricading) लावले आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेंडींग (barricading) काढून टाकून पाण्याला वाट करून दिली, असेही कुमार यांनी सांगितले.
१८८२ नंतर यंदा सर्वाधिक पाऊस
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. १८८२ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्टोबर महिन्यात (Otober Month) पाऊस पडत आहे. आत्तापर्यंत ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत २१० मिमी (210mm) पाऊस झालेला आहे. पुण्यात दरवर्षी सरासरी ७०० मिमी पाऊस पडतो, पण यंदा १ हजार मिमी पाऊस झाला आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने हा साधारण पाऊस नाही तर ढगफुटीचा प्रकार आहे. ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती (natural disaster) आहे. पावसाळी गटार टाकताना मागील १०० वर्षातील पावसाचा विचार करून त्याचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था केली आहे. पण पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते (Road), चौक या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पावसाळी गटारांची क्षमता (Capacity of sewers) वाढविण्यासाठी आम्ही नियोजन करू, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.