पुणे: Pune : मानाच्या गणपतीच्या आधी विसर्जन मिरवणूक (Ganesh festival) काढून घ्यावी यासाठी का दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावली त्याचे आभार मानले. मात्र, गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींनी भरपूर वेळ खाल्ल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यावर आज मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणेकरांची माफी मागितली आणि यापुढे कमी वेळ करण्यासाठी उपाययोजना केले जातील असे आश्वासन दिले.
मानाची पाच गणपती मंडळे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टच्या अध्यक्ष व पदाधिका-यांच्या तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. कसबा गणपती मंडळाचे ॠग्वेद निरगुडकर, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते.
मानाचा गणपती आधी मिरवणूक काढू द्यावी याची मान्यता घेण्यासाठी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली. हा पुणेकरांच्या श्रद्धेचा विजय असून याबद्दल उच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानत असल्याची भावनाभावना पदाधिकार्यांनी व्यक्त केली. यावर्षी विसर्जन मिरवणूक जवळ जवळ ३१ तास झाली त्यामुळे पुन्हा एकदा मानाच्या मंडळाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्भूमीवर शहरातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तसेच सर्व संबंधित घटकांनी एकत्रित करून विश्वासात घेणार असल्याचं मानाच्या गणपती मंडळांनी म्हंटल आहे. विसर्जन मिरवणुकील लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना अखणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे