Pune Election update:मनसेचे इंजिन नव्या ट्रकवर; ठाकरेंचे राजदूत चमत्काराच्या तयारीत
Pune Election update:पुणे(pune): मनसे (MNS) नेहमीच आपल्या नवीन राजनीतासाठी चर्चेत असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेननेकडूनही(Maharashtra nav nirman sena) निवडणुकीसाठी खास रणनीती निश्चित करण्यात आली असून मनसेची धुरा यंदा राजदूतांवर असणार असल्याच्या चर्चा आहे. महापालिका निवडणुका (Mahapalika Nivadnuk) कधी होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी निवडणूक तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत मनसे साडेतीन हजार राजदूतांची नियुक्ती करणार आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर मनसेने भर दिला असून मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay) नी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतली. राजदुतांची नियुक्ती या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून मनसे पुण्याच्या (Pune) प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका याअंतर्गत करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्यक तयारी मनेसेकडून सुरू झाली आहे. संबंधित भागात पक्षाची ध्येय धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी राजदूतांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक आहे. त्या नगरसेवकाने केलेले काम ही मतदारापर्यंत पोहचविण्याचे आदेश राजदूतांना देण्यात येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेची ही नवी संकल्पना किती उपयुक्त ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.
must read
- शिवसेना- MNSची ‘ती’ राजकीय लढाई सुरूच; आता शिवसेनेकडून अयोध्येला जाणार ‘हा’ मोठा नेता
- Indian tourism :कमी बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी ” ही” सुंदर ठिकाणे एकवेळ नक्की एक्सप्लोर करा
- Agriculture News : जोरदार पावसामध्ये अशी घ्या जनावरे-पिकांची काळजी; लम्पी रोगाबाबत सल्लाही वाचा की