Pune Education: पुणे : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे (Pune Municipal Corporation education department) १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने (ideal teacher award) गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दहा शिक्षक महापालिकेच्या पीएमसी शाळेचे (PMC school) तर चार शिक्षक खासगी शाळांमधील आहेत. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी (education year) आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ५९ प्रस्ताव हे प्राथमिक शिक्षण विभागाकडे primary education department देण्यात आले होते. या पुरस्कार निवड समितीसाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देऊन गौरविण्यात येणार आहे.
- Modi Government : मोदी सरकार विवाहितांना देणार दरमहा 18,500 रुपये; फक्त करा ‘हे’ काम
- CM Eknath Shinde: नव्या सरकारचा दमदार झटका; पहा कसा बसणार खिशाला फटका
- Pune News: ‘त्या’ अभियानात 28 हजार पुणेकरांचा सहभाग; पहा काय करणार ते शहरात
महापालिकेच्या शाळांमध्ये अंकुश माने (विद्यानिकेतन क्रमांक १९, कात्रज), ज्ञानेश हंबीर (मनपा शाळा क्र. १८१ मुलांची, खराडी), नवनाथ भोसले (मनपा शाळा क्र. १९, मुलींची खराडी), रजनी गोडसे (मनपा शाळा क्र ९९, मुलींची, वडगावशेरी), हेमलता चव्हाण (विद्यानिकेतन क्र. १९ कात्रज), विजय माने (क्रीडानिकेतन ८३ बी, हडपसर), राणी कुलकर्णी (मनपा शाळा क्र.१६२ बी, कात्रज), चित्रा पेंढारकर (मनपा शाळा क्र ७४ जी, वारजे), स्मिता धारूरकर (मनपा शाळा क्र १६८ बी, हिंगणे खुर्द), वर्षा पंचभाई (मनपा शाळा क्र. ९७ जी, ढोले पाटील रस्ता), पुष्पा देशमाने (नवीन मराठी शाळा), रोहिणी हेमाडे (चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय), डॉ. प्रीती मानेकर (हिंद इंग्लिश मीडियम स्कूल, विमाननगर) व मएसोच्या शुभदा शिरोडे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
वरील माहिती ही शिक्षण विभागाच्या प्राथमिक प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिली.