Pune: चांदणी चौकात (Chandani Chowk) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority of India) मोठा गाजावाजा करून चांदणी चौकात स्फोट (Blast) केला, पण ६०० किलो स्फोटके वापरूनही काम अर्धवटच राहिले आहे. येथील खडक फोडण्यासाठी पुढील ८ दिवस मध्यरात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे रात्री वाहतुकीचा खोळंबा होणार आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे (Flyover) काम सुरू आहे. आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम करताना मात्र ‘एनएचएआय’ च्या मंकी नऊ येत आहे. पाषाण बावधन (PASHAN BAVDHAN) हा पूल पाडल्यानंतर या ठिकाणचा रस्ता मोठा होईल, असे सांगण्यात आलेले होते. पण पूल पाडल्यानंतरही खडक फोडण्याचे काम सुरू आहे. भर दुपारी वाहतूक असताना रस्ता बंद करून खडक फोडल्याची घटना यापूर्वी दोनदा घडली आहे. त्यामुळे आता स्वतःच्या कामात सुधारणा करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खडक फोडण्यासाठीचे नीटनेटके नियोजन केलेले आहे.
- Pune : कात्रज – कोंढवा रस्ता बाधितांसाठी पुणे महापालिकेने मागितले (Pune Municipal Corporation) इतके कोटी
- Air India Women Pilot Joya Agarwal : झोया अग्रवाल या महिला पायलटला भेटा जिने आपल्या कष्टाने बालपणीची स्वप्ने केली साकार
- Gopika Govind: गोपिका गोविंद बनली राज्यातील पहिली आदिवासी एअर होस्टेस, 12 वर्षांच्या संघर्षानंतर ती घेणार स्वप्नांचे उड्डाण
- Pune Municipal Corporation : म्हणून केली महापालिकेने सिंहगड रस्त्यावर कारवाई
पुण्यातील चांदणी चौकात १० ऑक्टोबरपासून रात्री १२.३० ते १ पर्यंत अर्धा तासासाठी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात येत असून साधारणपणे ८ ते १० दिवस दररोज रात्री अर्धा तास वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
दोन्ही बाजूचे खडक फोडण्याचे काम सध्या सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.
चांदणी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेला पुल २ ऑक्टोबर रोजी पाडण्यात आला. त्यानंतर साताऱ्याहून (Satara ) मुंबईकडे (Mumbai ) जाण्याचा पुल पाडला त्या ठिकाणी तीन लेन आहेत. तर मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करताना त्या भागात चार लेन तयार करण्यात आल्या आहेत.
पूल पाडला पण बॉटलनेक कायम
चांदणी चौकातील एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे रस्ता रुंदीकरण रखडलेले आहे. महापालिकेने या ठिकाणचे भूसंपादन पूर्ण करून ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) हस्तांतरित केली. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काम सुरु न केल्याने सहा पदरी (लेन) असलेला महामार्ग सोसायटीपासून पुढे केवळ दोन पदरीच होतो. त्यामुळे मोठा गाजावाजा करून चौकातील पूल पाडला असला तरी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील बॉटलनेक कायम आहे.