Pune : महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कामाचा दर्जा सुधारण्यासाठी (Quality Improvement) अभियंत्यांना पदोन्नती (Engineers Promotion) देण्यापूर्वी त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षा (Exam) घेण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकार्यांच्या नुकतेच झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
महापालिकेमध्ये सध्या अभियंता वर्गाच्या पदांची सरळसेवा भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेचे काम आयबीपीएस (IBPS) या देशपातळीवर स्पर्धा परिक्षा घेणार्या संस्थेच्या माध्यमातून राबविली जात आहे. नुकतेच विविध शाखेतील अभियंत्यांची परिक्षा घेण्यात आली असून तिचे निकालही शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहेत.
- Dengue : पावसाळ्यात ‘या’उपायांद्वारे रोखा Dengue.. वाचा तुमच्यासाठी महत्वाची माहिती..
- Swadeshi Ecommerce: सरकार जोरात.. आणले स्वदेशी ई-कॉमर्स; पहा नेमके काय आहे प्रकरण
- Modi Government: अनेकांना धक्का..! आता ‘या’ मोठ्या बँकेतील हिस्सेदारी विकणार सरकार
महापालिकेमध्ये अभियंता वर्गाची संख्या १ हजार ७५ इतकी आहे. त्यापैकी सध्या सुमारे ५७५ पदे कार्यरत असून नव्याने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे २०० पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रियेमध्ये अभियंता वर्गाची २५ टक्के पदे अंतर्गत पदोन्नतीतून भरण्यात येतात. प्रामुख्याने बिगारी, शिपाई, क्लार्क यासारख्या पदांवर काम करणार्या कर्मचार्यांना कनिष्ठ अभियंता या पदावर संधी दिली जाते. या कर्मचाऱ्यांना अभियांत्रिकीची पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्याची अटही अनिवार्य आहे. मात्र, ही पदोन्नती देताना अनेकदा त्यांना प्रत्यक्षात अभियांत्रिकी कामाचा अनुभव अल्प असतो. महापालिकेमध्ये बराच काळ सरळसेवेने भरती झाली नसल्याने पदोन्नतीतून अनेक पदे भरली गेली आहेत. यामुळे अभियांत्रिकी कामाच्या अल्पअनुभवाचा थेट परिणाम विकासकामांवरही झालेला दिसून येतो. अभियंत्यांच्या कामामध्ये, निर्णय क्षमतेमध्ये तसेच कामाच्या क्वालिटीमध्ये वाढ करण्यासाठी पदोन्नतीसाठी काय निकष असावेत यादृष्टीने अधिकार्यांची चर्चा झाली. यामध्ये पदोन्नती देताना त्रयस्थ संस्थेच्या मार्फत लेखी परिक्षा घेउनच पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.