Pune : पुणे : शहरातील चौकाचौकात रस्त्या रस्त्याने अनधिकृत फ्लेक्स (illegal flex) लावून राजकीय कार्यकर्त्यांनी शहराचे विद्रुपीकरण सुरू ठेवले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Prime Minister Narendra Modi) ते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यापर्यंत सर्वजण शहर स्वच्छ ठेवा, असे आवाहन करत असले तरी भाजपचे कार्यकर्ते (BJP Workers) मात्र काही ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठलेली असताना आता स्वतः चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांपुढे हात जोडले आहे. सत्काराच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, “शहरात तुम्ही माझे अनधिकृत फ्लेक्स लावता, त्यामुळे लोक नाराज होतात. यापुढे शहरात माझे अनधिकृत फ्लेक्स कुठेही लावू नका तसेचफटाके फोडून कचरा केला तर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आहे तसा परत जाईन,” असा दम कार्यकर्त्यांना भरला.

शहर भाजप (Pune BJP) तर्फे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने चंद्रकांत पाटील यांचा टिळक स्मारक मंदिर (Tilak Smarak Mandir) येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्रम स्थळी स्वागत होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी माळ लावली, त्यामुळे टिळक स्मारक मंदिराच्या परिसरात मोठा कचरा झाला होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचे फ्लेक्स लागले आहेत. यातील सर्व फ्लेक्स महापालिकेची (Pune Municipal Corporation) परवानगी न घेता अनधिकृत ठिकाणी लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून त्यावरून सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. हाच धागा पकडून पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुद्दा मांडला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मला येणाऱ्या काळात “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” करायचे आहे. पण यासाठी आधी माझे अनधिकृत फ्लेक्स लावणे बंद करावे लागेल. अनधिकृत फ्लेक्समुळे शहर विद्रुप दिसते, वृत्तपत्रांमधून वारंवार अशा प्रकारच्या बातम्या छापून येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाके फोडणे, हवेमध्ये कागद सोडल्यानंतरचा हा कचरा कुणीही उचलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एकीकडे स्वच्छतेचा संदेश देत असताना आपण असा कचरा करणे योग्य नाही. यापुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी फटाके फोडल्यास गाडीत बसून परत निघून जाईन. तुम्हाला फ्लेक्स लावायचेच असल्यास पैसे भरून अधिकृत फ्लेक्स (legal flex) लावा. दहाच्या बदल्यात दोनच फ्लेक्स लावा पण अनधिकृत फ्लेक्स लावू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी भाजपचे कार्यकर्ते सुधारणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version