मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीचे मजबूत निकाल सादर केले आहे. या निकालांनुसार, सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा वार्षिक ७४ टक्क्यांनी वाढून १३३६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ७६२६ कोटी रुपये होता.
एसबीआयने सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीसाठी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बँकेच्या उत्पन्नात जोरदार वाढ झाली आहे. बँकेचा नफा आणि व्याज उत्पन्न दोन्ही वाढले आहे. दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली आहे.

देशातील सर्वात मोठ्या बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ८८७३३.८६ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीतील रु. ७७६८९.०९ कोटी उत्पन्नापेक्षा १४% जास्त आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत १३ टक्क्यांनी वाढून ३५१८३ कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत ३११८३ कोटी रुपये होते.
सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही सुधारला आहे. त्रैमासिक आधारावर, निव्वळ एनपीए १% ते ०.८% कमी झाले, तर सकल एनपीए ३.९१% वरून ३.५२% पर्यंत घसरले. त्रैमासिक आधारावर तरतूदही ३१% ने घटून ३०४० कोटी रुपये झाली आहे. तर निव्वळ व्याज मार्जिन वार्षिक आधारावर ३.५०% वरून ३.५५% पर्यंत वाढले आहे. या कालावधीत, एकूण कर्ज १९.९३ टक्क्यांनी वाढून ३०.४ लाख कोटी रुपये झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठेवी देखील वार्षिक आधारावर १०% वाढून ४१.९ लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत, तर किरकोळ वैयक्तिक कर्ज १८.८ टक्क्यांनी वाढून १०.७ लाख कोटी रुपये झाले आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version