मुंबई : एनपीए कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यावर दिसू लागला आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले की, एनपीएमध्ये घट झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा ५० टक्क्यांनी वाढून २५६८५ कोटी रुपये झाला आहे.
- Digital Payment : म्हणून रोखीच्या चलनाची वाढ मंदावली : एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार
- Q2 Result : या कंपनीला झाला रुपये ५७१.५ कोटीचा तोटा : ऑपरेटिंग महसूल ७६% वाढला
- Sberbank sues Glencore : म्हणून रशियन बँकेने उचलले हे पाऊल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- IPO News : आता “या” ६ कंपन्या उभारणार ‘आयपीओ’मधून ८००० कोटी
२०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत या बँकांचा निव्वळ नफा ३२ टक्क्यांनी वाढून ४०,९९१ कोटी रुपये झाला आहे. सीतारामन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, एनपीए कमी करण्यासाठी आणि पीएसबीची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी सरकारच्या सततच्या प्रयत्नांचे ठोस परिणाम दिसून येत आहेत. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात मात्र ९ ते ६३ टक्क्यांनी घट झाली आहे. बुडित कर्जासाठी जास्त तरतूद केल्यामुळे त्यांचा नफा कमी झाला आहे.
बँकांच्या नफ्यात १४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात कॅनरा बँकेचा निव्वळ नफा ८९% वाढून रु. २,५२५ कोटी झाला आहे. यूको बँकेचा नफा १४५ टक्क्यांनी वाढून ५०४ कोटी रुपये झालाय तर बँक ऑफ बडोदाचा निव्वळ नफा ५८.७०% वाढून रु. ३३१२.४२ कोटी इतका झाला आहे. इतर १० बँकांचा नफा १३ वरून १४५% पर्यंत वाढला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला १०३% अधिक नफा झाला आहे.