Prohibitory Orders । फिरायला जाताय? तर थांबा… ‘या’ जिल्ह्यातील पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश, जाणून घ्या

Prohibitory Orders । जर तुम्ही पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा. कारण नुकतेच पुणे जिल्ह्यातील मावळ, आंबेगाव, खेड, मुळशी, हवेली, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले तसेच स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे यांसारख्या ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

उल्लंघन केल्यास होईल कारवाई

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्था, संघटना यांनी उल्लंघन केले तर ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहू शकतात.

प्रतिबंध लागू असणारी ठिकाणे

भोर तालुका: भाटघर धरण आणि गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण आणि गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा
मावळ तालुका: भुशी डॅम, धरणे आणि गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली’ (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे
मुळशी तालुका: मुळशी धरण आणि ताम्हीणी घाट जंगल परिसर आणि मिल्कीबार धबधबा
हवेली तालुका: खडकवासला धरण, वरसगाव धरण आणि सिंहगड, गडकिल्ले परिसर
लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्द: लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, राजमाची पॉईंट, पवना धरण, टाटा धरण, खंडाळा, सहारा ब्रीज, घुबड तलाव परिसर
आंबेगाव तालुका: डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा
इंदापूर तालुका: कुंभारगाव बोटींग क्षेत्र
जुन्नर तालुका: माळशेज घाट, धरणे आणि गडकिल्ले परिसर, शिवनेरी आणि माणिक डोह
खेड तालुका: भिमाशंकर चासकमान धरण आणि भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे आणि जंगल परिसर

प्रतिबंधित क्रिया-

  • पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येता येणार नाही
  • खोल पाण्यात उतरणे आणि त्यात पोहता येणार नाही
  • धबधब्यावर जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास बंदी
  • पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे
  • धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध
  • मद्यधुंद अवस्थेत प्रवेश तसेच कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास बंदी
  • मद्य बाळगणे, वाहतूक करणे, अनधिकृत विक्री व उघड्यावर सेवन करण्यास बंदी
  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवण्यास बंदी
  • धबधब्यावर मद्यपान करण्यास प्रतिबंध

Leave a Comment