Private Granted School Job । खासगी अनुदानित शाळांसाठी आनंदाची बातमी; ‘इतक्या’ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होणार भरती

Private Granted School Job । राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने जोमाने तयारी सुरु केली आहे. राज्यात निवडणुकीपूर्वी कर्मचारी भरतीच्या हालचालींना वेग आला आहे.

याबाबतचा प्रस्ताव देखील शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आहे. त्यासाठी 33 हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला असल्याने आता तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी आता खासगी अनुदानित संस्थांमधील कर्मचारी भरतीच्या प्रश्नाचं 2005 पासून भिजत घोंगडं पडलं आहे.

  • दरम्यान, 2005 पासून खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही
  • 2019 मध्ये शासनाच्या संचमान्यतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने ही भरती स्थगित झाली आहे.
  • पुढे 2023 मध्ये न्यायालयाने स्थगिती उठवली
  • 30 सप्टेंबर 2023 च्या पटसंख्येनुसार भरती होणार आहे.
  • वरिष्ठ, कनिष्ठ आणि मुख्य लिपिक, प्रयोगशाळा शिपाई आणि ग्रंथपालपदाचा समावेश असणार आहे.
  • अत्यल्प किंवा विना पगार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

30 सप्टेंबर 2023 नुसार सरल पोर्टलवरील आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य धरली जाणार असल्याने तब्बल 19 वर्षानंतर राज्यभरातील 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल.

दरम्यान, नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. ८१ हजार १३७ कोटींच्या सात प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यातून २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

Leave a Comment