मुंबई (mumbai): ब्रिटनचे (Britain) होणारे पंतप्रधान ऋषी सुनक (Prime Minister Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murthy) यांनी २०२२ मध्ये भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी फर्म (IT farm) इन्फोसिस (Infosys) मधील तिच्या शेअर होल्डिंगमधून (share Holding) १२६.६१ कोटी रुपये (USD 15.3 दशलक्ष) लाभांश उत्पन्न मिळवले आहेत. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये (Stock Exchange) दाखल केलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे सह-संस्थापक (Infosys co-founder) नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याकडे सप्टेंबर अखेर इन्फोसिसचे ३.८९ कोटी शेअर्स किंवा ०.९३ टक्के शेअर्स (Shares) होते, असे समोर आले आहे.
बीएसईवर (BSE) मंगळवारच्या ट्रेडिंग किमतीत (Trading Price) रु. ५९५६ कोटी (सुमारे USD 721 दशलक्ष) इतकी त्यांची होल्डिंग (Holding) आहे. कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार (Stock Exchange Filing), इन्फोसिसने (Infosys) या वर्षी ३१ मे रोजी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १६ रुपये अंतिम लाभांश (final Dividend) दिला आहे. चालू वर्षासाठी, कंपनीने या महिन्यात १६.५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. दोन्ही लाभांश एकूण ३२.५ रुपये प्रति शेअर किंवा अक्षतासाठी १२६.६१ टी रुपये होते. इन्फोसिस ही भारतातील सर्वोत्तम लाभांश (Best dividend) देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. २०२१ मध्ये, त्याने एकूण ३० रुपये प्रति शेअर (Per share Dividend) लाभांश दिला, ज्यामुळे अक्षताला त्या कॅलेंडर वर्षात (Calendar Year) एकूण ११९.५ कोटी रुपये मिळाला आहे.
- British prime minister rishi sunak यांचे पुढे आले पाकिस्तानी कनेक्शन; पहा काय आहे नेमके नाते
- UK Former Prime Minister Pension: अबबो…ब्रिटनच्या या माजी पंतप्रधांनाना मिळणार दरवर्षी इतकी पेन्शन
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
अक्षता मूर्ती यांचे पती ऋषी सुनक यांनी नुकतीच कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (Conservative Party) नेतृत्व करण्याची शर्यत जिंकली आणि आता ते ब्रिटनचे भारतीय वंशाचे (Indian Origin) पहिले पंतप्रधान बनवले आहे. आधुनिक काळातील सर्वात तरुण नेते (Young Leader) ते बनले आहेत. ऋषी सुनक यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व (British citizenship) आहे, तर त्याची पत्नी अक्षता या भारतीय नागरिक आहे. त्यांच्यी बिगर-निवासी (Non-Resident) स्थिती, जी त्यांना १५ वर्षांपर्यंत ब्रिटनमध्ये कर (Taxes in Britain) न भरता परदेशात पैसे कमविण्याची परवानगी देते, ही यूकेमध्ये एक फूट पाडणारी समस्या (divisive issue) आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा सुनकने पहिल्यांदा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत प्रवेश केला तेव्हा अक्षताचा बिगर-निवासी (Non-Resident) दर्जा ब्रिटनमध्ये चर्चेचा मुद्दा बनला. त्या वेळी, तिच्या प्रवक्त्याने असे म्हटले होते की भारताची नागरिक म्हणून, ती दुसर्या देशाचे नागरिकत्व धारण करण्यास असमर्थ आहे आणि “तिच्या सर्व यूकेच्या उत्पन्नावर (UK Income) यूके कर (UK taxes) भरणे नेहमीच आहे आणि राहील.” या समस्येचा वाद वाढल्याने त्यांनी त्यावेळी जाहीर केले की त्या, “ब्रिटिश निष्पक्षतेच्या भावनेतून (British sense of fairness)” त्यांच्या जगभरातील कमाईवर यूके कर (UK Tax) भरेल. इन्फोसिस फाइलिंगनुसार, प्रवर्तकांकडे कंपनीचा (Company promoters) १३.११ टक्के हिस्सा आहे. यामध्ये, मूर्ती कुटुंबाकडे ३.६ टक्के (नारायण मूर्ती यांच्याकडे ०.४० टक्के, त्यांची पत्नी सुधा ०.८२ टक्के, मुलगा रोहन १.४५ टक्के आणि मुलगी अक्षता यांच्याकडे ०.९३ टक्के हिस्सेदारी आहे). इतर प्रवर्तकांमध्ये सह-संस्थापक (Co-Founder) एस. गोपालकृष्णन, नंदन एम. नीलेकणी आणि एस डी. शिबुलाल आणि त्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे.