President Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ( President Election) विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे उमेदवार असतील. त्याची औपचारिक घोषणा दुपारी अडीच वाजता केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यशवंत सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये (NDA government) केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले होते. 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सामील होण्यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये भाजप सोडला.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.