Praful Patel । प्रफुल्ल पटेल करणार घरवापसी? ‘त्या’ वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Praful Patel । गतवर्षी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. पण आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याला कारणही अगदी तसेच आहे.

अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मतदारसंघात म्हणजे त्यांच्याच कन्या भाग्यश्री अत्राम हलगेकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आहेत. त्यामुळे धर्मरावबाबा संतापले असून त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी निशाणा साधला त्यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धर्मरावबाबा अत्राम यांना घरचा आहेर दिला.

“मी देखील शरद पवार यांच्याकडूनच शिकलो आहे. माझ्यासाठी ते आदरणीय होते आणि अजूनही आहेत. पण एका आदरणीय नेत्याचा सन्मान कमी होता कामा नये,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यावर आता धर्मरावबाबा अत्राम काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पण त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ हे दौऱ्यादरम्यान नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या अनुपस्थितीचा कुठलाही अर्थ-अनर्थ काढू नका. आम्ही महायुती म्हणून सगळे सोबत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने लढणार आहोत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष कोणत्या जागांवर लढणार यावर अनेक चर्चा सुरू महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागांचं वाटपही होणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment