Government scheme : सरकारची खास योजना! घरबसल्या होईल 2 लाखांचा फायदा

Government scheme : केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विमा योजना होय. या योजनेअंतर्गत तुम्हाला घरबसल्या 2 लाख रुपयांचा फायदा होईल.

कोणाला करता येतो अर्ज?

18 ते 70 वर्षे वयोगटातील देशातील कोणत्याही नागरिकाला नागरिक या योजनेसाठी अर्ज करता येतो. यासाठी उमेदवाराचे बचत बँक खाते असावे लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जावे लागणार आहे.

तुम्हाला तिथे जाऊन बँक मॅनेजर किंवा बँक कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगावे लागणार आहे. तुम्हाला तुमची बँक एक फॉर्म देईल. हे भरून तुम्ही या योजनेत सामील होऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग करत असाल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

रक्कम खात्यातून होते कट

हे लक्षात घ्या की या विम्याचा प्रीमियम प्रति वर्ष 20 रुपये आहे. हा प्रीमियम थेट बँक खात्यातून कापला जातो. पॉलिसीचे एक वर्षानंतर नूतनीकरण करणे गरजेचे आहे. तुम्हाला यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे किंवा ऑनलाइन रिन्यूही करता येईल.

तुम्हाला दरवर्षी बँकेत जायचे नसल्यास तुम्ही बँकेला ऑटो डेबिटसाठी विचारू शकता. यासह, दरवर्षी नूतनीकरण करण्याची कसलीही गरज नाही आणि रक्कम थेट खात्यातून कापली जाईल. दरवर्षी १ जून रोजी खात्यातून प्रीमियमची रक्कम कापण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते तपशील
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा कोणताही ओळखपत्र पुरावा

जाणून घ्या फायदा

विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंग झाल्यास या योजनेचा लाभ मिळतो, हे विसरू नका. तसेच अपंगत्वाच्या बाबतीत किती रक्कम मिळेल हे अपंगत्वाच्या मर्यादेवर अवलंबून असते.

  • समजा अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात व पाय निकामी झाला तर किंवा एक डोळा, एक हात किंवा पाय निकामी झाला तर 2 लाख रुपये देण्यात येतात.
  • मृत्यूनंतर 2 लाख रुपये मिळतील.
  • अपघातात एक डोळा, एक पाय किंवा एक हात काम करणे थांबवले तर विमाधारकास 1 लाख रुपये दिले जातात.

Leave a Comment